स्वाईन फ्लूचा कहर कायम, रुग्णांची संख्या दहा हजारावर
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
हेल्पलाईन २४ तास सुरू ठेवण्याचे राज्यांना निर्देश
स्वाईन फ्लूचा कहर कायम, रुग्णांची संख्या दहा हजारावर
हेल्पलाईन २४ तास सुरू ठेवण्याचे राज्यांना निर्देशनवी दिल्ली : देशातील स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा आकडा पार केला असून, रोग देखरेख सेल आणि आवश्यक हेल्पलाईन २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश कॅबिनेट सचिव अजित सेठ यांनी सर्व राज्य सरकारांना दिले आहेत.स्वाईन फ्लूच्या फैलावाची समीक्षा करण्यासाठी गुरुवारी सेठ यांच्या अध्यक्षतेत राष्ट्रीय आपदा प्रबंधन समितीची बैठक बोलावण्यात आली होती. आवश्यक औषधींची उपलब्धता आणि लसीकरण व उपचारासाठी दिशानिर्देश सुनिश्चित करण्याचे निर्देश सेठ यांनी या बैठकीत राज्यांच्या औषध नियंत्रकांना दिले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात ही माहिती दिली आहे. दरम्यान देशभरात १ जानेवारीपासून स्वाईन फ्लूने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून ६६३ झाली आहे तर दहा हजारावर रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. नागालँड आणि मिझोरम यासारख्या नव्या राज्यांमध्येही स्वाईन फ्लू पसरला आहे. (वृत्तसंस्था)