शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
7
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
8
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
9
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
10
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
11
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
13
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
14
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
15
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
16
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
17
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
18
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
19
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
20
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी

शपथविधीपूर्वीच एनडीएत रुसवेफुगवे, पाकवरुन शिवसेना नाराज

By admin | Updated: May 25, 2014 12:03 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रीत केल्याने एनडीएतील घटकपक्ष शिवसेना भाजपवर नाराज आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २५ - नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीच भाजपप्रणीत एनडीएत रुसवेफुगवे सुरु झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रीत केल्याने एनडीएतील घटकपक्ष शिवसेना भाजपवर नाराज आहे. शपथविधी सोहळ्याविषयी शिवसेनेची पुढील भूमिका ठरवण्यासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे रविवारी संध्याकाळी शिवसेना पदाधिका-यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. 
लोकसभा निवडणुकीत भरघोस मताधिक्य मिळवत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर विराजमान होणार आहेत. सोमवार २६ मेरोजी होणा-या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासह सार्कमधील सर्व देशांच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रीत केले आहे. मोदींनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रीत केल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएची सत्ता आल्यास भाजपसह शिवसेना नेतेही पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊ असे सांगत होते. मात्र निवडून येताच मोदींनी पाकिस्तानला निमंत्रीत केल्याने शिवसेना नेतृत्व भाजपवर नाराज आहेत. शिवसेनेने या सोहळ्याविषयी अद्याप मौन बाळगले आहे. नवाझ शरीफ यांच्या उपस्थितीत शिवसेना खासदार मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ घेणार की नाही यावर शिवसेनेत विचारमंथन सुरु आहे. यासाठी रविवारी संध्याकाळी सहा वाजता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिका-यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत शपथविधी सोहळ्यातील शिवसेनेच्या भूमिकेवरील निर्णय घेतला जाईल. 
शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील १८ जागांवर झेंडा फडकावला आहे. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या वाट्याला मंत्रिपद येणार हे निश्चित आहे. दरम्यान, शिवसेनेच्या या कोंडीवर काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. शिवसेनेचे आत्तापर्यंतचे विधान आणि पाकिस्तानविषयीची भूमिका हा केवळ राजकीय सोयीसाठी आहेत असे काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. 
शिवसेनेने पाकिस्तानला नेहमीच कडाडून विरोध केला आहे. मुंबईत पाकिस्तानसोबतचे क्रिकेट सामने होऊ देणार नाही, पाकिस्तान कलाकारांना मुंबईत येऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने नेहमीच मांडली आहे.