स्वराज/ जोड काँग्रेसकडून हीन राजकारण-जावडेकर
By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ललित मोदी यांची एकत्रित छायाचित्रे जारी करीत काँग्रेसने हीन राजकारण चालविले आहे. त्यातून या पक्षाची दिवाळखोरीच दिसून येत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.
स्वराज/ जोड काँग्रेसकडून हीन राजकारण-जावडेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ललित मोदी यांची एकत्रित छायाचित्रे जारी करीत काँग्रेसने हीन राजकारण चालविले आहे. त्यातून या पक्षाची दिवाळखोरीच दिसून येत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.काँग्रेसने कुठलाही मुद्दा नसताना विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्या वादाला राईचा पर्वत बनविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. राहुल गांधी सुटीवर कुठे गेले होते, ते कोणाच्या व्हिसावर गेले होते ते स्पष्ट करावे. काँग्रेसला अशा राजकारणात पडायचे असेल तर आम्हीही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे विविध घोटाळ्यातील आरोपींसोबतचे छायाचित्रे दाखवू शकतो. नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि ललित मोदी यांचे एकत्रित छायाचित्र घेण्यात आले तेव्हा आयपीएलचे अध्यक्ष असलेल्या ललित मोदींवर कोणतेही आरोप नव्हते, असेही जावडेकर म्हणाले.