शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी ओमजी महाराज बिग बॉसच्या घरातून थेट तुरूंगात?

By admin | Updated: October 20, 2016 17:16 IST

पहिल्याच भागात घरात प्रथम शिरणारे स्पर्धक स्वामी ओमजी महाराजांनी आपल्या वाचाळपणाचा आणि कारनाम्यांचा नमुना दाखविण्यास पहिल्या दिवसापासूनच सुरुवात

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस’च्या 10व्या पर्वाला सुरुवात झाली आणि सुरुवातीपासूनच अनेक नवनवीन गोष्टींच्या चर्चेला उधाण आले. पहिल्याच भागात घरात प्रथम शिरणारे स्पर्धक स्वामी ओमजी महाराज सध्या चांगलेच चर्चेत आहेत.  आपल्या वाचाळपणाचा आणि कारनाम्यांचा नमुना दाखविण्यास त्यांनी पहिल्या दिवसापासूनच सुरुवात केली.
 
स्वामी ओमजी महाराज जरा हटके आहेत हे तर शोच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला समजलं असेल, पण इतके हटके असतील हे तुम्हाला माहित नसेल.  ओमजी महाराजांवर सायकल चोरी, हत्यार बाळगणे आणि चोरीच्या उद्देशाने जबरदस्ती दुस-याच्या घरात घुसण्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून जर ते न्यायालयात हजर झाले नाही तर त्यांना लवकरच अटक करण्यात येऊ शकते. त्यामुळे बिग बॉसच्या घरातून थेट तुरूंगात त्यांची रवानगी होऊ शकते.
 
 स्वामी ओमजी महाराजांविरोधात दिल्लीच्या साकेत न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट जारी केला आहे. त्यांच्यावर एका महिलेने चोरीच्या उद्देशाने बळजबरी घरात घुसण्याचा आरोप केला आहे. ओमजी महाराज यांचा छोटा भाऊ प्रमोद झा यांनीही त्यांच्यावर दिल्लीच्या लोधा कॉलोनीतील एका सायकल दुकानाचं कुलुप तोडून 3 लोकांसह 11 सायकल आणि अन्य महागडं सामान तसेच काही कागदपत्र चोरी करण्याचा आरोपही लावला होता.    
 
बिग बॉस 10 च्या प्रिमियरच्या 2 दिवसांपूर्वी चोरी प्रकरणात त्यांच्याविरोधात अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 ऑक्टोबरला सुनावणीदरम्यान त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, ओमजी आणि त्यांच्याकडून कोणीही न्यायालयात उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केलं. याप्रकरणाची पुढील सुनावणी 8 नोव्हेंबरला होणार आहे.