शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश राज्यपालांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: March 26, 2015 01:02 IST

मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांचा पुत्र शैलेश याचा लखनौमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे.

लखनौ : मध्य प्रदेशचे राज्यपाल रामनरेश यादव यांचा पुत्र शैलेश याचा लखनौमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात सध्या गाजत असलेल्या व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या घोटाळ््यात राज्यपाल यादव यांच्याप्रमाणेच ५० वर्षीय शैलेशही आरोपी आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मुलाच्या मृत्यूचे वृत्त थडकताच अस्वस्थ झालेल्या राज्यपाल यादव यांना भोपाळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कोट्यवधी रुपयांच्या ‘व्यापमं’ घोटाळ्यातील आरोपी असलेल्या शैलेशचा मृतदेह मंगळवारी पित्याच्या लखनौमधील शासकीय निवासस्थानी संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृत्यूमागचे नेमके कारण लगेच सांगता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. व्यापमं घोटाळ्यात आरोपी म्हणून नाव आल्यापासून शैलेश प्रचंड तणावाखाली होता. हा तणावच त्याच्या मृत्यूचे कारण असण्याची शक्यता आहे’, असे काँग्रेसचे नेते सत्यदेव त्रिपाठी यांनी म्हटले आहे. पोलिसांनी मृत्यूच्या प्राथमिक अंदाजाबाबत मौन बाळगले आहे. राज्यपाल यादव यांच्या लखनौ येथील मॉल एव्हेन्यू भागात असलेल्या शासकीय निवासस्थानी शैलेशचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सीबीआय चौकशीची काँग्रेसची मागणीशैलेश व्यापमं घोटाळ्यात आरोपी असल्यामुळे त्याच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. मधुमेहग्रस्त शैलेशचा मृत्यू ब्रेन हॅमरेज किंवा हृदयविकाराच्या धक्क्यामुळे झाल्याचा प्राथमिक तर्क आहे. च्व्यापमं घोटाळ्यात शैलेशने १० उमेदवारांची ग्र्रेड-३ शिक्षकपदावर भरती निश्चित केल्याचा आणि त्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशचे माजी मंत्री असलेले यादव यांनी व्यापम घोटाळ्यात आपले नाव सामील करण्याला उच्च न्यायालयात आव्हानही दिलेले आहे.