शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

माय-लेकीचा संशयास्पद मृत्यू राजस हॉस्पिटलमधील घटना : गळा दाबून हत्या केल्याचा संशय ; पती फरार

By admin | Updated: May 6, 2016 22:11 IST

जळगाव : रिंगरोडवरील डॉ.राजेंद्र सरोदे यांच्या राजस हॉस्पिटलमध्ये वरच्या मजल्यावर वास्तव्याला असलेले सचिन गुमानसिंग जाधव (वय ४० मूळ गाव मोयगाव ता.जामनेर) यांची पत्नी कविता (वय ३५) व मोठी मुलगी रिया (वय १५) या दोघांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता दोघांचा मृतदेह घरात आढळून आला. दरम्यान, गळा दाबून त्यांची हत्या केली असावी असा संशय पोलीस व वैद्यकीय सूत्रांनी वर्तविला आहे, असे असले तरी शवविच्छेदनातच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सचिन हा मध्यरात्रीपासून फरार झाल्याने संशय अधिकच बळावला आहे.

जळगाव : रिंगरोडवरील डॉ.राजेंद्र सरोदे यांच्या राजस हॉस्पिटलमध्ये वरच्या मजल्यावर वास्तव्याला असलेले सचिन गुमानसिंग जाधव (वय ४० मूळ गाव मोयगाव ता.जामनेर) यांची पत्नी कविता (वय ३५) व मोठी मुलगी रिया (वय १५) या दोघांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता दोघांचा मृतदेह घरात आढळून आला. दरम्यान, गळा दाबून त्यांची हत्या केली असावी असा संशय पोलीस व वैद्यकीय सूत्रांनी वर्तविला आहे, असे असले तरी शवविच्छेदनातच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सचिन हा मध्यरात्रीपासून फरार झाल्याने संशय अधिकच बळावला आहे.
रिंग रोडवर महेश प्रगती मंडळाच्या सभागृहासमोर डॉ.राजेंद्र सरोदे यांचे राजस हॉस्पिटल आहे. सचिन जाधव हा गेल्या १९ वर्षापासून सरोदे यांच्याकडेच कामाला आहे. अत्यंत विश्वासू असल्याने डॉ.सरोदे यांनी अडीच वर्षापूर्वी त्याला हॉस्पिटलमध्ये वरच्या मजल्यावर दोन खोल्यांचे घर दिले होते. त्यात पत्नी कविता, मुलगी रिया व वेदीका असे चौघे जण राहत होते. परीक्षा संपल्याने लहान मुलगी धुळे येथे मामाकडे गेली होती, त्यामुळे घरात तिघेच राहत होते.
ग्राहक महिलेने पाहिली घटना
कविता जाधव या कॉस्मेटीक वस्तुची मार्केटींग करायच्या. त्यामुळे रोज त्यांच्याकडे दहा ते पंधरा महिलांचे येणे-जाणे होते. त्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी पोलीस मुख्यालयातील एक महिला त्यांच्याकडे वस्तु घेण्यासाठी आल्या असता घराचा दरवाजा उघडा व पडदा टाकलेला होता. आवाज दिल्याने प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घरात प्रवेश केला तर दोघं माय-लेकी झोपलेल्या दिसून आल्या. जवळ जाऊन पाहिले तर दोघांचा चेहरा लाल व काळा पडलेला तर हात पाय वाकडे झालेले होते. दोघंही मयत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने हा प्रकार कर्मचार्‍यांना सांगून घाबरलेल्या अवस्थेत तेथून पळ काढला.
डॉ.सरोदेंनी कळवली घटना पोलिसांना
माय-लेकीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर डॉ.सरोदे यांनी घरात जाऊन पाहणी केली व पोलिसांना घटनेची माहिती दिली. तत्पूर्वी हरीश महाजन या कंपाउंडरनेही सकाळी सात वाजता सचिन याला आवाज दिला परंतु आतून प्रतिसाद आला नाही, दरवाजा थोडा उघडा दिसला तर दोघं माय-लेकी झोपलेल्या दिसल्या. सचिन नेहमीप्रमाणे बाहेर पाण्याचा जार घ्यायला गेला असावा म्हणून हरीश खाली आला.