शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

आयएएस अधिकाऱ्याचा बंगळुरुत संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: March 18, 2015 00:16 IST

कर्तव्यदक्ष युवा आयएएस अधिकारी बेंगळुरू येथील अतिरिक्त वाणिज्य कर आयुक्त डी.के. रवी यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत सीबीआय चौकशीची मागणी करीत निदर्शक मंगळवारी रस्त्यावर उतरले.

बेंगळुरू/ कोलार : कर्तव्यदक्ष युवा आयएएस अधिकारी बेंगळुरू येथील अतिरिक्त वाणिज्य कर आयुक्त डी.के. रवी यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत सीबीआय चौकशीची मागणी करीत निदर्शक मंगळवारी रस्त्यावर उतरले. कोलार जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला असता दगडफेकीच्या तुरळक घटनाही घडल्या. दरम्यान, विरोधकांनी कर्नाटक विधानसभेतही या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली.२००९ च्या कर्नाटक तुकडीतील अधिकारी असलेले ३५ वर्षीय रवी हे कोलार जिल्ह्यात उपआयुक्त असताना त्यांनी जमीन आणि वाळूमाफियांवर केलेली कारवाई गाजली होती. त्यानंतर काही दिवसांतच वाळूमाफियांच्या दबावामुळे रवी यांची बेंगळुरू येथे बदली करण्यात आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी जोरदार विरोध केला होता. (वृत्तसंस्था)संशयास्पद मृत्यू डी.के. रवी हे सोमवारी सकाळी कार्यालयातून घरी परतल्यानंतर त्यांच्या सरकारी सदनिकेत त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. त्यांच्या घरी आत्महत्येचे कारण सांगणारी कोणतीही चिठ्ठी सापडली नसली तरी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल करीत चौकशी चालविली आहे. न्यायवैद्यक, वैद्यकीय चाचणी आणि परिस्थितीजन्य सर्व पैलू पाहता सकृद्दर्शनी आत्महत्या असल्याचे दिसून येते, असा दावा बेंगळुरूचे पोलीस आयुक्त एम.एन. रेड्डी यांनी केला आहे.परिस्थिती हाताळणे राज्याच्या हाती- रिजिजूआयएएस अधिकारी डी.के. रवी यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळणे सर्वस्वी कर्नाटक सरकारची जबाबदारी असून त्यात केंद्राची कोणतीही भूमिका नाही, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले. अधिकाऱ्यांचा थेट संबंध राज्याशी असल्यामुळे केंद्राला राज्य सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करणे अवघड ठरते. हा मुद्दा गंभीर असून मंगळवारी संसदेतही तो उपस्थित झाला आहे. मी काही बोललो असतो तर केंद्राचा अनावश्यक हस्तक्षेप मानला गेला असता. त्यामुळे मी राज्याकडून उत्तर मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे, असे ते म्हणाले.