शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती

By admin | Updated: May 10, 2017 07:42 IST

हेरगिरी व विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या आणि पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने

नवी दिल्ली : हेरगिरी व विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या आणि पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या कुलभूषण सुधीर जाधव यांच्या शिक्षेला नेदरलँडमधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (इंटरनॅशनल कोर्ट आॅफ जस्टीस) स्थगिती दिली आहे. भारताच्या मुसद्दीगिरीचा हा मोठा विजय असून आता कुलभूषण यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याचे मानले जात आहे. ‘इंटरनॅशनल कोर्ट आॅफ जस्टीस’ने यासंदर्भात एक पत्र पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही पाठविले आहे. विशेष म्हणजे भारताने यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाचे दार ठोठावले होते. त्यानंतर ‘इंटरनॅशनल कोर्ट आॅफ जस्टीस’ या संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. व्हिएन्ना कराराचा पाकिस्तानने भंग केल्याचे भारताने म्हटले होते; तसेच फाशीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. कुलभूषण मुंबईच्या पवई भागात राहणारे असून, त्यांचा हेरगिरीशी संबंध नाही, असे भारताने तसेच कुलभूषण यांच्या कुटुंबीयांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. कुलभूषण यांच्यावर पाकिस्तानच्या लष्करी कायद्यानुसार कोर्ट मार्शल चालवून त्यात त्यांना दोषी ठरवून पाकने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. (वृत्तसंस्था)ज्येष्ठ विधीज्ञ हरिश साळवे यांनी कुलभूषण यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कमपणे मांडली, असे टिष्ट्वट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केल्याचे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे न्यायालयास पटवून दिले.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय कुलभूषण यांच्या आईला कळविला आहे. - सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्रीआंतरराष्ट्रीय न्यायालयाने फाशीला दिलेली स्थगिती हा कोणाचा विजय किंवा पराभव नाही. या निर्णयामुळे कुलभूषण यांना काहिसा दिलासा मात्र जरूर मिळाला आहे. पाकिस्तानला आता आंतरराष्ट्रीय कायद्यानुसारच न्यायदानाचे काम करावे लागेल, असे अ‍ॅड. हरिश साळवे यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. हेकेखोरपणाला चापजाधव यांना ताब्यात घेऊन अटक करेपर्यंत पाकिस्तानने माहितीच दिली नव्हती. पाकच्या या हेकेखोरपणाला आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाने चाप बसला आहे. जाधव यांच्या अटकेनंतर पाकचा असा होता दावा-कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी होते. ते भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकचा दावा आहे.पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार जाधव यांस गेल्या वर्षी ३ मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक करण्यात आली. त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल, असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना १२ मे २0१४ रोजी पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकने या आरोपाच्या समर्थनार्थ त्यांच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली होती.