शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रजापती यांना जामीन देणारे न्यायाधीश निलंबित

By admin | Updated: April 30, 2017 00:55 IST

समाजवादी पार्टीचे नेते आणि माजी मंत्री गायत्री प्रजापती यांना जामीन देणाऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशाला शुक्रवारी निलंबित करण्यात आले. या न्यायाधीशाची विभागीय

अलाहाबाद : समाजवादी पार्टीचे नेते आणि माजी मंत्री गायत्री प्रजापती यांना जामीन देणाऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशाला शुक्रवारी निलंबित करण्यात आले. या न्यायाधीशाची विभागीय चौकशी करण्यात आली आहे. न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल या प्रकरणाची चौकशी करतील. रजिस्ट्रार जनरल डी. के. सिंह यांनी या घडामोडींना दुजोरा दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने शुक्रवारी प्रजापती यांच्या जामिनाला स्थगिती दिली होती. प्रजापती यांना अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या आईवर बलात्कार केल्याचाही आरोप आहे. त्यांना बुधवारी पॉक्सो न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. प्रजापती यांच्या दोन सहकाऱ्यांनाही जामीन मिळाला होता. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी एकेक लाख रुपयांचा वैयक्तिक जात मुचलका भरण्यास सांगितले होते. उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलाने १५ मार्च रोजी प्रजापती यांना आशियाना भागात अटक केली होती. त्यांना जामीन मंजूर करणारे अप्पर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ओम प्रकाश मिश्र यांना उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने निलंबित केले आहे. त्यांचे अधिकार गोठविण्यात आले आहेत. ते पॉक्सो न्यायालयात कार्यरत होते. मुख्य न्यायाधीशांनी न्यायाधीश मिश्र यांना निलंबित करण्यासह प्रजापती यांना जामीन देण्याच्या त्यांच्या आदेशाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली.- गंभीर गुन्ह्यात ज्या पद्धतीने जामीन देण्याची घाई करण्यात आली त्यावरून आम्हाला न्यायाधीशांच्या हेतूविषयी शंका वाटत आहे, असे मुख्य न्यायाधीशांनी म्हटले. - प्रजापती यांना जामीन देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या सरकारच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मिश्र यांच्यावर कारवाईचे संकेत मिळाले होते.