मोबाईलवरून अश्लील संभाषण करणारा अटकेत
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
औरंगाबाद : शहरातील महाविद्यालयीन तरुणी, महिला आणि पुरुषांना मोबाईलवरून फोन करून अश्लील संभाषण करणारा आणि सतत एसएमएस पाठविणार्या ट्रकचालकाला सायबर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी अटक केली.
मोबाईलवरून अश्लील संभाषण करणारा अटकेत
औरंगाबाद : शहरातील महाविद्यालयीन तरुणी, महिला आणि पुरुषांना मोबाईलवरून फोन करून अश्लील संभाषण करणारा आणि सतत एसएमएस पाठविणार्या ट्रकचालकाला सायबर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी अटक केली. शहेबाज खान एजाज खान (२९,रा. न्यू. रशिदपुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शहेबाज खान यास एक मोबाईल हँडसेट सापडला होता. त्या मोबाईलवरून तो सहा महिन्यांपासून शहरातील वेगवेगळ्या भागात राहणार्या नागरिकांना फोन करीत असत. महिला आणि मुलींना एसएमएस पाठवीत असत. त्याचा हा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याने तीन तक्रारी सायबर गुन्हेशाखेला प्राप्त झाल्या होत्या. एकाच क्रमांकावरून हे कॉल्स आणि एसएमएस येत असल्याने पोलसांनी त्याचा शोध सुरू केला. विशेष म्हणजे आरोपी ट्रकचालक असल्याने सतत फिरतीवर राहत असल्याने पोलिसांना त्याचा अचूक ठिकाणा मिळत नव्हता. दरम्यान, त्यास पकडण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी सांगितले. या कारवाईत पोलीस कर्मचारी धुडकू खरे, रेवनाथ गवळे, गणेश वैराळकर, नितीन देशमुख, सुदर्शन एखंडे यांनी सहभाग घेतला.