शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पनामा पेपर्स प्रकरण अमिताभ यांना भोवण्याची शक्यता, 'अतुल्य भारत'चे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर करण्यास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2016 08:58 IST

अमिताभ बच्चन यांना अतुल्य भारतचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याचा निर्णयाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने स्थगिती दिली आहे.

ऑनलाइन लोकमत -

नवी दिल्ली, १९- पनामा पेपर लीक प्रकरण बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांना चांगलंच भोवलं आहे. अमिताभ बच्चन यांना अतुल्य भारतचा  ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याच्या निर्णयाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने स्थगिती दिली आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार,  जोपर्यंत अमिताभ यांना क्लीन चिट मिळत नाही, तोपर्यंत त्यांची अँबेसेडर म्हणून नियुक्ती करता येणार नसल्याचं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं सांगितलं आहे.

सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात अमिताभ बच्चन यांना ब्रॅण्ड अँबेसेडर बनवण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. मात्र आता हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

पनामा पेपर लीक झाल्यानं जगभरात खळबळ उडाली होती. भारतातून अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन यांची नावं समोर आली होती. मोदी सरकारनं पनामा पेपर लिकमध्ये बच्चन यांचं नाव आल्यानं आता सावध पवित्रा घेतला आहे. आता फक्त प्रियंका चोप्रा अतुल्य भारतची ब्रँड अँबेसेडर असणार आहे.

पनामा पेपर लिकमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीयांची नावं असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. केंद्रीय मंत्रालयानं याप्रकरणी समिती नेमली आहे. अमिताभ बच्चन निर्दोष आढळल्यास त्यांच्या नावाचा पुनर्विचार केला जाईल, असंही केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे.