शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा स्वराज यांची प्रतिमा डागाळली?

By admin | Updated: June 15, 2015 00:21 IST

भारतातून पलायन करून गेली अनेक वर्षे ब्रिटनमध्ये दडून बसलेले ‘आयपीएल’चे वादग्रस्त कमिशनर ललित मोदी यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

हरीश गुप्ता, नवी दिल्लीभारतातून पलायन करून गेली अनेक वर्षे ब्रिटनमध्ये दडून बसलेले ‘आयपीएल’चे वादग्रस्त कमिशनर ललित मोदी यांना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचे एका ‘लीक’ झालेल्या ई-मेलवरून स्पष्ट झाल्यानंतर मोदी सरकारभोवती रविवारी एका नव्या वादाचे वादळ घोंगावत राहिले.सुषमा स्वराज यांच्या या ‘अनैतिक’ कृत्यावरून काँग्रेस त्यांच्यावर तुटून पडली तर भाजप अध्यक्ष अमित शहा व गृहमंत्री राजनाथ सिंह स्वराज यांच्या बचावासाठी धावले. ‘यात नैतिकतेचा काही प्रश्नच येत नाही,’असे शहा यांनी निवेदन केले तर त्याहून एक पाऊल पुढे जात राजनाथ सिंह म्हणाले, ‘सुषमाजींनी केले ते बरोबरच आहे... सरकार त्यांच्या पाठिशी उभे आहे, हेही मी स्पष्ट करतो.’ दिवसभरात सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशीही या प्रकरणी चर्चा केली.पण या सुषमा स्वराज-ललित मोदी प्रकरणाचे कवित्व अद्याप संपलेले नाही, हे दिवसभराच्या घटनांवरून स्पष्ट झाले. पेंचप्रसंग तूर्तास टळला असला तरी स्वराज यांनी केलेल्या बचावाच्या टिष्ट्वट्सनंतरही अनुत्तरीत राहिलेले अनेक प्रश्न नजिकच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाचा पिच्छा पुरवीत राहतील. पी. व्ही. नरसिंह राव, माधव सिंग सोलंकी, एस. एम. कृष्णा व शशी थरूर मंत्री असतानाही हे मंत्रालय असेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.स्वराज दिवसभर पत्रकारांच्या समोर आल्या नाहीत पण किमान डझनभर टिष्ट्वट करून त्यांनी आपले म्हणणे मांडले. त्याने काँग्रेस व इतर विरोधी पक्षांचे समाधान झाले नाही व त्यांनी स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.समाजवादी पक्षासह काही पक्ष स्वराज यांच्या बचावासाठी पुढे आल्याने त्या या वादातून तूर्तास तरी बाहेर येतील. पण सुषमा स्वराज यांचे पती आणि पुतण्याच्या माध्यमातून समोर आलेल्या हितसंबंधांच्या संघर्षाचा विषय विरोधकांना पुढील अनेक दिवस टिकेला मसाला पुरवीत राहील. (या पुतण्याला कीथ वाझ यांच्या मदतीने लंडनच्या एका कॉलेजात प्रवेश मिळाला होता.) या पेंचप्रसंगामुळे मोदी-शहा-जेटली या त्रिमूर्तीला सरकार व पक्षातील नाराज वर्तुळांपासून दूर ठेवणे शक्य होईल, असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.लंडनच्या ‘संडे टाइम्स’ने रविवारी जाहीर केलेल्या या वृत्तावरून हे सिद्ध झाले की, ललित मोदींना न्यायालयाने ‘फरार’ घोषित केलेले आहे. भारत सरकारसाठी ते ‘वॉन्टेड’ असूनही पत्नीच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना पोर्तुगालला जाऊ देण्याबाबत सुषमा स्वराज ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांश्ी जुलै २०१४ मध्ये सर्वप्रथम बोलल्या होत्या.