शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

अपहृत ३९ भारतीयांची हत्या झाल्याचे उघड, सुषमा स्वराज यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:50 IST

इसिस या दहशतवादी संघटनेने २०१४ मध्ये इराकमधून अपहरण केलेल्या सर्व ३९ भारतीय नागरिकांना ठार मारले असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : इसिस या दहशतवादी संघटनेने २०१४ मध्ये इराकमधून अपहरण केलेल्या सर्व ३९ भारतीय नागरिकांना ठार मारले असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.या सर्वांना नेमके कधी ठार मारण्यात आले हे अद्याप समजू शकले नाही. ते सर्व पंजाब, हिमाचल प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालचे रहिवासी होते. इराकच्या मोसुल शहराजवळील बदूश गावातून हे मृतदेह मिळाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. तेथील एका कंपनीत हे भारतीय नागरिक काम करत होते.मोसुल शहरातून इसिसने ४० भारतीयांचे अपहरण केले होते. यातील एक व्यक्ती बांगलादेशातील मुस्लीम असल्याचे सांगून निसटला होता. उर्वरित ३९ भारतीयांना बदूश येथे नेऊन त्यांची हत्या करण्यात आली. ज्या कंपनीत हे भारतीय काम करत होते त्याच कंपनीने ही माहिती दिली आहे.सुषमा स्वराज यांनी सांगितले की, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी इराकमधील भारतीय राजदूत आणि इराक सरकारच्या एका अधिकाऱ्यासोबत बदूश शहरात जाऊन अपहृत भारतीयांचा शोध सुरू केला, तेव्हा स्थानिक लोकांनी सांगितले की, इसिसच्या दहशतवाद्यांनी काही मृतदेह दफन तिथे केले आहेत. राज्यमंत्री सिंह यांनी सांगितले की, रडारच्या माध्यमातून शोध घेतला असता खड्ड्यांमध्ये हे मृतदेह आढळून आले.मृतदेह मिळाले, डीएनए झाले मॅचसुषमा स्वराज यांनी सांगितले की, भारतीय अधिकाºयांनी आपल्या इराकी समकक्ष अधिकाºयांना मृतदेह बाहेर काढण्याची विनंती केली. येथे खोदकाम केल्यानंतर ३९ मृतदेह मिळाले आहेत. याशिवाय, काही ओळखपत्र, बूट आदी वस्तू मिळाल्या आहेत. हे मृतदेह डीएनए चाचणीसाठी बगदादला पाठविण्यात आले आहेत. तपासात ३८ भारतीयांचा डीएनए जुळून आला आहे. तर, ३९ व्या मृतदेहाचा डीएनए नातेवाइकांच्या डीएनएशी ७० टक्के जुळून आला आहे. हे मृतदेह भारतात आणण्यासाठी राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे इराकमध्ये जाणार आहेत.मृतदेह आणण्यासाठी लागू शकतो आठवडाया ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात आणण्यास ८ ते १० दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री सिंह यांनी दिली. सिंह म्हणाले की, ही कायदेशीर प्रक्रिया आहे. इराककडून माहितीची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.ममता बॅनर्जींनी व्यक्त केले दु:खकोलकाता : इराकमध्ये भारतीय नागरिकांना ठार मारल्याच्या घटनेबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी व्टिट केले आहे की, हे वृत्त ऐकून मी अतिशय दु:खी आहे. शोकाकूल कुटुंबांच्या सांत्वनासाठी शब्द पुरेसे नाहीत.राहुल गांधी यांना धक्काभारतीय नागरिकांच्या मृत्यूचे वृत्त ऐकून आपल्याला धक्का बसला आहे, असे सांगत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबत दु:ख व्यक्त केले आहे. आम्ही पीडित कुटुंबीयांसोबत असल्याचेही ते म्हणाले.आपने मागितला स्वराज यांचा राजीनामाचंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंंग यांनी भारतीय नागरिकांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तर, आम आदमी पार्टीचे कंवर संधू यांनीही घटनेबाबत दु:ख व्यक्त करत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज