शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुषमा स्वराज वादामागे भाजपातील अस्तनीतले साप - किर्ती आझाद

By admin | Updated: June 15, 2015 12:50 IST

भाजपातील अस्तनीतले साप व एक ख्यातनाम पत्रकाराने सुषमा स्वराज यांच्याविरोधात कट रचल्याचे ट्विट भाजपा खासदार किर्ती आझाद यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत  
नवी दिल्ली, दि. १५ - आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदींची मदत केल्याप्रकरणी गोत्यात आलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची पक्षश्रेष्ठींकडून पाठराखण केली जात असली तरी भाजपा खासदाराचे ट्विटने या वादाला नवीन वळण दिले आहे . भाजपातील अस्तनीतले साप व एक ख्यातनाम पत्रकाराने सुषमा स्वराज यांच्याविरोधात कट रचल्याचे ट्विट खासदार किर्ती आझाद यांनी केले आहे. 
 
घोटाळ्यात गुंतलेले आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना ब्रिटनमध्ये प्रवासासाठी दस्तऐवज उपलब्ध करवून दिल्याबद्दल विदेशमंत्री सुषमा स्वराज वादाच्या भोव-यात अडकल्या आहेत.  पक्षाध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह आदी ज्येष्ठ नेत्यांनी सुषमा स्वराज यांची पाठराखण केली आहे. पण सुषमा स्वराज वादामागे पक्षांतर्गत मंडळीचा हात असावा अशी शंका किर्ती आझाद यांच्या ट्विटमधून येते. आझाद यांनी केलेल्या ट्विटमध्ये भाजपातील अस्तनीचे साप व पत्रकारांनी हे षडयंत्र रचल्याचे म्हटले आहे. किर्ती आझाद यांनी स्वतःदेखील सुषमा स्वराज यांचे समर्थन केले आहे.

स्वराज यांनी वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांचा कडाडून विरोध दर्शवला होता.  आझाद यांचा रोख कोणाच्या दिशेने आहे याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.  विशेष म्हणजे भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील किर्ती आझाद यांच्या विधानाते अप्रत्यक्षपणे समर्थन केले. 'किर्ती आझाद हे माझे चांगले मित्र आहेत, ते जे बोलतात ते विचार व अभ्यास करुनच बोलतात' अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.