शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आता मनपाकडून सर्वेक्षण फुले मार्केट: सहा पथकांव्दारे आजपासून कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 00:32 IST

जळगाव : सेंट्रल फुले मार्केटचे महसूल विभागाकडून सर्वेक्षण सुरू झाले असतानाच महापालिकेकडूनही हे सर्वेक्षण करावे असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले असून त्यानुसार गुरुवारी महाापालिकेच्या सहा पथकांव्दारे हे काम करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जळगाव : सेंट्रल फुले मार्केटचे महसूल विभागाकडून सर्वेक्षण सुरू झाले असतानाच महापालिकेकडूनही हे सर्वेक्षण करावे असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले असून त्यानुसार गुरुवारी महाापालिकेच्या सहा पथकांव्दारे हे काम करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सेंट्रल फुले मार्केटमधील गाळे लीजवर देण्याची मागणी व्यापार्‍यांनी फेडरेशन स्थापन करून महसूल विभागाकडे केली आहे. त्याची दखल घेत महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी जिल्हाधिकार्‍यांकडून तीन दिवसात अहवाल मागविला आहे. महसूल विभागाने ७ पथकांची नियुक्ती करून मार्केटचे सर्वेक्षण केले.
७८१ गाळे धारकांकडून घेतली माहिती
महसूल विभागाने सुरू केलेल्या सर्वेक्षणात मंगळवार व बुधवार असे दोन दिवस व्यापार्‍यांकडील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या दोन दिवसात ९१८ पैकी ७८१ गाळेधारकांकडून माहिती घेण्यात आली. गुरुवारी दुपारी १२ पर्यंत हे कामकाज पूर्ण करून सायंकाळपर्यंत जिल्हाधिकार्‍यांना अहवाल देण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. बरेच गाळे बंद असल्यामुळे कामकाजात काहीसा अडथळा येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
आयुक्तांनाही आदेश
महसूल विभागाच्या प्रधान सचिवांनी दिलेल्या आदेशांची जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनाही माहिती दिली असून त्यांनीही महापालिकेडून स्वतंत्र सर्वेक्षण करावे अशा सूचना दिल्या आहेत.
गुरुवारपासून मनपाचे सर्वेक्षण
जिल्हाधिकार्‍यांच्या या आदेशानुसार महापालिकेकडून सेंट्रल फुले मार्केटमधील गाळ्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी विविध प्रभागी समिती कार्यालयांमधील कर्मचार्‍यांचा समावेश असलेली सहा पथके तयार करण्यात येणार आहेत. दोन दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दोन दिवसात या संदर्भातील अहवाल सादर केला जाईल.
-संजय कापडणीस, आयुक्त मनपा