शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उपकरप्राप्त इमारतींचा सर्व्हे २३ फेब्रुवारीपासून

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

उपकरप्राप्त इमारतींचा सर्व्हे २३ फेब्रुवारीपासून

उपकरप्राप्त इमारतींचा सर्व्हे २३ फेब्रुवारीपासून
धोकादायक इमारतीतील रहिवाशांचे होणार स्थलांतर
मुंबई :
दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरांतील मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण म्हाडा लवकरच हाती घेणार आहे. २३ फेब्रुवारी ते १५ मार्चपर्यंत म्हाडा हे सर्वेक्षण करणार असून धोकादायक इमारतींतील रहिवाशांना तात्काळ स्थलांतरीत करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.
शहरात म्हाडाच्या जुन्या व मोडकळीस आलेल्या हजारो उपकरप्राप्त इमारती आहेत. पावळ्यापुर्वी या इमारतींचा सर्व्हे म्हाडा करते. या सर्व्हेनंतर एप्रिल महिना अखेर म्हाडाकडून धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. यानंतर अतिधोकादायक ठरविण्यात आलेल्या इमारतीमधील रहिवाशांना तात्काळ स्थलांतरीत करण्यासाठी नोटिसा देण्यात येतात. गतवर्षी म्हाडाने ८ इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्या होत्या.
या वर्षी २३ फेब्रुवारी ते १५ मार्च दरम्यान या इमारतींचे सर्वेक्षण करण्यात येणार असून रहिवाशांना स्थलांतरीत करण्यासाठी म्हाडा अधिकार्‍यांना बराच वेळ मिळणार आहे. परंतू उपकरप्राप्त इमारतीमधून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आल्यानंतर त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्यासाठी कित्येक वर्षे जातात. यापुर्वी संक्रमण शिबिरांमध्ये पाठविण्यात आलेले रहिवाशी अद्यापही संक्रमण शिबिरामध्ये खितपत पडले आहेत. इमारतीचा पुर्नविकास वेळेत होत नसल्याने आणि रहिवाशांना उपनगरात पाठविण्यात येत असल्याने बरेच रहिवाशी याला विरोध दर्शवितात. त्यामुळे धोकादायक इमारतीमधील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. सर्वेक्षणादरम्यान डागडुजी आवश्यक असलेल्या इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यामुळे उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.