शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य ! एकदा चार्ज केल्यावर 50 दिवस चालणारा फोन लाँच

By admin | Updated: April 23, 2017 17:45 IST

टेलिकॉम कंपनी झिवीने नुकताच एक नवीन जबरदस्त फीचर असलेला फोन लाँच केला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - मोबाईलच्या बाजारात एका वेगळ्याच प्रकारची क्रांती अनुभवायला मिळते आहे. बाजारात नवं नवे फीचर असलेले अनेक स्मार्टफोन दाखल होत असतानाच जिओनीनंतर आता टेलिकॉम कंपनी झिवीने नुकताच एक नवीन जबरदस्त फीचर असलेला फोन लाँच केला आहे. सुमो टी -3000 असं या फोनचं नाव असून, तो एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 50 दिवस चालू शकतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. भारतात या फोनवर कमी बजेट असलेल्या अनेकांच्या उड्या पडत आहेत. झिवीच्या या फोनची किंमत फक्त 1490 रुपये आहे. या फोनमध्ये एक शक्तिशाली बॅटरी बसवण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन वारंवार चार्ज करावा लागणार नसल्याची माहिती झिवी मोबाईल फोन कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी पंकज आनंद यांनी दिली आहे. फोनची स्क्रीन हातातून खाली पडल्यामुळे अथवा इतर कोणत्याही कारणास्तव फुटल्यास स्क्रीन बदलता येऊ शकेल, असंही कंपनीनं सांगितलं आहे. या फोनचा सर्वाधिक वापर ग्रामीण भागात होण्याची शक्यता असून, विजेचा तुटवडा असलेल्या गावांमधल्या ग्राहकांसाठी हा फोन फायदेशीर ठरणार आहे. या फोनमध्ये 2.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये फ्लॅशसोबत फीचर कॅमे-याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. फोनमध्ये ऑटो कॉल रेकॉर्ड आणि मोबाईल ट्रॅकरचीही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही कोणालाही फोन केल्यास तो रेकॉर्ड होणार आहे. मात्र तुम्ही ऑटो कॉल रेकॉर्डचं फीचर फोनमधल्या सेंटिग्जमधून बंदही करू शकता. तसेच मोबाईलला टच लाइट देण्यात आली असून, जीपीआरएस सिस्टिमही बसवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला जीपीआरएसच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करता येणार आहे. एकंदरीतच कमी बजेट असलेल्या आणि स्मार्टफोनची हौस नसलेल्या ग्राहकांसाठी हा फोन एक वरदान ठरणार आहे.