शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य! अवघ्या 12 रुपयांत आता विमान प्रवास

By admin | Updated: May 23, 2017 17:45 IST

एअरलाइन्स कंपनीनं पाच दिवसांसाठी एक विशेष ऑफर प्रवाशांसाठी सेवेत आणली आहे.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 23 - उन्हाळ्याच्या दिवसांत तुम्ही सुट्टी व्यतित करण्यासाठी काही बेत आखताय. मात्र अजूनही एअर तिकीट बुक न केल्यास घाबरण्याचं काही कारण नाही. कारण आता तुम्ही फक्त नाममात्र 12 रुपयांमध्ये हवाई प्रवास करू शकता. यासाठी एअरलाइन्स कंपनीनं पाच दिवसांसाठी एक विशेष ऑफर प्रवाशांसाठी सेवेत आणली आहे. तुम्हीही या पाच दिवसांत तिकीट बुक करून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची मजा लुटू शकता. लो कॉस्ट एअरलाइन्सच्या स्पाइसजेट या कंपनीनं स्वतःच्या 12व्या वर्षपूर्तीनिमित्त ही ऑफर प्रवाशांना भेट स्वरुपात दिली आहे. या ऑफर अंतर्गत 23 मे ते 28 मे 2017 रोजीपर्यंत तुम्ही तिकीट बुक करू शकता. प्रवासी या दिवसांत केवळ 12 रुपयांत तिकीट बुक करू शकतात. तिकीट बुक केल्यामुळे प्रवासी 26 जून ते 24 मार्च 2018पर्यंत प्रवास करू शकतात. मात्र यासाठी प्रवाशांना एअरपोर्ट टॅक्स आणि इतर सरचार्ज वेगळे द्यावे लागणार आहेत. कंपनीकडे या ऑफरसाठी मर्यादित तिकिटं उपलब्ध आहेत. या ऑफरनंतर एक लकी ड्रॉसुद्धा काढण्यात येणार आहे. त्याअंतर्गत प्रवाशांना मोफत आंतरराष्ट्रीय तिकिटं जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच कोणत्याही हॉटेलमध्ये थांबण्यासाठी 10 हजार रुपयांचं गिफ्ट वाऊचरही कंपनीकडून देण्यात येणार आहे.