शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

हेमामालिनी यांच्यावर शस्त्रक्रिया

By admin | Updated: July 4, 2015 02:43 IST

राजस्थानातील दौसा येथे अपघातात जखमी झालेल्या अभिनेत्री व खासदार हेमामालिनी यांच्या नाक व कपाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

जयपूर : राजस्थानातील दौसा येथे अपघातात जखमी झालेल्या अभिनेत्री व खासदार हेमामालिनी यांच्या नाक व कपाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात त्यांच्या कारचालकास निष्काळजीपणे गाडी चालविण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रमेशचंद ठाकूर असे त्याचे नाव आहे.आग्रा-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर दौसानजीक गत रात्री हेमामालिनी यांच्या मर्सिडीज कारने समोरून येणाऱ्या कारला धडक दिली होती. या अपघातात एका चार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला होता, तर हेमांसह पाच जण जखमी झाले होते. या प्रकरणी हेमा यांचा कारचालक रमेशचंद ठाकूर यास शुक्रवारी कोतवाली ठाण्यात अटक करण्यात आली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पल्लवी शर्मा यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला.अपघातानंतर ६६ वर्षीय हेमामालिनी यांना गुरुवारी रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे संचालक पी. तांबोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे नाक तसेच उजव्या डोळ्याच्या वर कपाळाला जखम झाली होती. नाकाच्या हाडाला दुखापत (मायनर फ्रॅक्चर) झाली होती. त्यामुळे मध्यरात्रीनंतर प्लास्टिक सर्जन संदीपन मुकुल यांनी त्यांच्या नाक आणि भुवयांच्या नजीक प्लास्टिक सर्जरी केली. हे घाव भरण्यासाठी सहा आठवड्यांचा काळ लागेल. तूर्तास हेमा स्वस्थ आहेत. त्यांची कन्या ईशा त्यांच्यासोबत आहे. (वृत्तसंस्था)