शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या रुग्णाच्या मणक्यावर शस्त्रक्रिया मोफत : उल्हास पाटील रुग्णालयात उपचार

By admin | Updated: March 29, 2016 00:25 IST

जळगाव - पुणे येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले ३६ वर्षीय रुग्णाच्या मानेच्या मणक्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

जळगाव - पुणे येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले ३६ वर्षीय रुग्णाच्या मानेच्या मणक्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
पुणे येथे खाजगी वाहन चालक असलेले दीपक भीमराव भटकर हे मूळचे बुलडाणा जिल्‘ातील शेगाव येथील रहिवासी आहे. व्यवसायानिमित्त ते पुणे येथे वास्तव्यास असून गेल्या दहा वर्षापासून ते वाहन चालकाचे काम करतात. हे काम करत असताना अचानक त्यांच्या डाव्या हाताला मुंग्या येणे, हात दुखणे असा त्रास होऊ लागला. भटकर यांनी सुरवातीला घरगुती इलाज केला. पण हाताचे दुखणे वाढतच गेले. अशा परीस्थितीत त्यांनी पुणे येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्याठिकाणी त्यांना औषधी देण्यात आल्या. मात्र औषधांनी फारसा आराम पडला नाही. त्यामुळे त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. गावी आल्यानंतर त्यांनी खामगाव येथे एका डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी भटकर यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला. रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल यांनी दीपक भटकर यांची एमआरआय तपासणी केली. या तपासणीत भटकर यांच्या डाव्या हाताची नस मानेच्या मणक्याखाली दबली असल्याचे निदान झाले. तसेच भटकर यांना शस्त्रक्रियेचाही सल्ला देण्यात आला. या शस्त्रक्रियेसाठी जास्त खर्च लागणार होता. परंतु डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा त्यांना लाभ मिळवून देण्यात आला. शस्त्रक्रियेदरम्यान अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल व डॉ. साहील कालरा यांनी मणक्यात दबलेली नस गादी काढून मोकळी केली. तसे गादीच्या ठिकाणी कमरेचे हाड टायटॅनियमच्या प्लेटद्वारे बसविण्यात आले. ही शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची होती. परंतु डॉ. दीपक अग्रवाल व डॉ. साहील कालरा यांच्या तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नामुळे शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. आता दीपक भटकर यांना पूर्वीप्रमाणे हाताची हालचाल करता येणे शक्य झाले असून अवघ्या एका दिवसात त्यांना चालता येऊ लागले. तसेच त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे. शस्त्रक्रियेसाठी डॉ. दीपक अग्रवाल व डॉ. साहील कालरा यांना भूलतज्ज्ञ डॉ. देवेंद्र चौधरी, डॉ. सागर, डॉ. पार्थ पटेल, डॉ. अमित वैरागडे, डॉ. देवेशक्रिष्णा यादव, डॉ. शरयु वारे, डॉ. प्रियंका वानखेडे यांनी सहकार्य केले.