शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सहाराची संपत्ती विकण्यास सेबीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2016 17:17 IST

गुंतवणुकदारांचे बुडालेले पैसे त्यांना परत मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सेबीला सहाराची संपत्ती विकण्याची परवानगी दिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २९  - गुंतवणुकदारांचे बुडालेले पैसे त्यांना परत मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सेबीला सहाराची संपत्ती विकण्याची परवानगी दिली आहे. सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी जामीनाचे 10 हजार कोटी रुपये उभे करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 27 एप्रिलला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
 
हा निर्णय देताना न्यायालयाने संपत्ती विकताना काही अटीदेखील घातल्या आहेत. ज्यामध्ये बाजारभावानुसार 90 टक्याहून जास्त किंमत मिळत असेल तर संपत्तीचा लिलाव करण्यात यावा मात्र जर 90 टक्यांपेक्षा कमी भाव मिळत असेल तर संपत्ती विकण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सेबी 86 ठिकाणची संपत्ती विकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहे. या पैशातून सुब्रतो रॉय यांच्या जामीनासाठी रक्कम उभारण्याचादेखील प्रयत्न केला जाणार आहे. 
 
सहाराच्या सर्व संपत्तीची कागदपत्रे सेबीच्या हवाली असून यामध्ये एकूण 40 हजार कोटींची संपत्ती असल्याचा दावा सहाराने केला आहे. सहाराची देशाबाहेरदेखील मोठी संपत्ती आहे.  ज्यामध्ये न्यूयॉर्कमधील प्लाझा हॉटेल तसंच लंडनमधील ग्रोसवेनर हाऊसचा समावेश आहे. सुब्रतो रॉय यांना 2014 मध्ये अटक करण्यात आली होती. गुंतवणूकदारांचे 24 हजार कोटी परत न केल्याने सहाराच्या सुब्रतो राय यांना 2014 मध्ये अटक करण्यात आली. ते सध्या तिहार जेलमध्ये आहेत.
 
संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे देणे भागवण्याचे आदेश त्यांना कोर्टाने या आधीच दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 2012 मध्ये पहिल्यांदा सहारा समुहाला गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. सेबी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरदेखील सहारा समुहाने गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना न्यायालयात हजर राहाण्यास सांगितले होते. त्यालाही रॉय यांनी टाळाटाळ केली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत लखनऊ पोलिसानी सुब्रतो रॉयना दिल्लीत आणून न्यायालयासमोर सादर केले. यावेळी न्यायालयाकडून त्यांना दहा हजार कोटी रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु, ते त्याची पूर्तता करू शकले नाहीत, ज्यानंतर त्यांना जामीन मिळाला नाही.