शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तलाकच्या कायदेशीर बाजूंवरच विचार करणार : सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: February 15, 2017 00:18 IST

मुस्लिमांमधील तीन वेळा तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाच्या प्रथेच्या केवळ कायदेशीर बाजूंशीच संबंधित प्रश्नावर आम्ही निर्णय घेऊ

नवी दिल्ली : मुस्लिमांमधील तीन वेळा तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाच्या प्रथेच्या केवळ कायदेशीर बाजूंशीच संबंधित प्रश्नावर आम्ही निर्णय घेऊ आणि इस्लामी कायद्याखाली होणाऱ्या तलाकवर न्यायालयाने देखरेख ठेवण्याची गरज आहे का या प्रश्नाचा आम्ही विचार करणार नाही, कारण तो विषय विधिमंडळाच्या कक्षेतील आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले.तुम्ही (वादी आणि प्रतिवादींचे वकील) एकत्र बसून आमच्याकडून कोणत्या मुद्द्यांवर विचार व्हावा याचा निर्णय घ्यावा. निर्णय घेण्यासाठी ते आम्ही १६ फेब्रुवारी रोजीच्या यादीत समाविष्ट करीत आहोत, असे सरन्यायाधीश जे. एस. खेहार, न्या. एन. व्ही. रामणा आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले. एखाद्या विशिष्ट प्रकरणाच्या वस्तुस्थितीच्या बाजूंचा आम्ही विचार करणार नाही. प्रश्नाची कायदेशीर बाजू विचारात घेऊ, असे खंडपीठाने संबंधित पक्षांना स्पष्ट केले. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे यात आम्हाला काही स्वारस्य नाही तर आम्हाला फक्त त्याच्या कायदेशीर बाजुंचाच विचार करायचा आहे, असे खंडपीठाने म्हटले.