मारन यांना हायकोर्टात पाठवण्याचा आदेश मागे सुप्रीम कोर्ट : अवघ्या काही तासांतच फिरवला निर्णय
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
नवी दिल्ली : एअरसेल- मॅक्सीस सौद्याबाबत द्रमुकचे नेते दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी यांना आरोपी म्हणून पाचारण करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याचा आदेश दिल्यानंतर सवार्ेच्च न्यायालयाने अवघ्या काही तासांतच तो फिरवल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.
मारन यांना हायकोर्टात पाठवण्याचा आदेश मागे सुप्रीम कोर्ट : अवघ्या काही तासांतच फिरवला निर्णय
नवी दिल्ली : एअरसेल- मॅक्सीस सौद्याबाबत द्रमुकचे नेते दयानिधी मारन आणि त्यांचे बंधू कलानिधी यांना आरोपी म्हणून पाचारण करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याचा आदेश दिल्यानंतर सवार्ेच्च न्यायालयाने अवघ्या काही तासांतच तो फिरवल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.२ जी स्पेक्ट्रम प्रकरणाशी संबंधित सर्व प्रकरणांची सुनावणी सवार्ेच्च न्यायालयांतच करण्याची व्यवस्था याच न्यायालयाच्या एका आदेशानुसार करण्यात आली असल्याकडे सीबीआयने लक्ष वेधल्यानंतर न्या. व्ही. गोपाल गौडा आणि न्या. आर. भानुमती यांनी आदेश फिरविला. २ जी स्पेक्ट्रमच्या सर्व प्रकरणांची सुनावणी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील खंडपीठाकडे होत आहे. या सर्व प्रकरणांची सुनावणी केवळ एकाच ठिकाणी होईल. देशात अन्य कोणत्याही न्यायालयात होणार नाही, असा आदेश सवार्ेच्च न्यायालयाने यापूर्वी दिला आहे, ही बाब अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी सीबीआयची बाजू मांडताना निदर्शनास आणून दिली. त्यानंतर भोजन अवकाशाला काही वेळ उरला असताना खंडपीठाने आपला आदेश बदलला. आनंद यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत न्यायालयाने आपला आदेश मागे घेत हे प्रकरण ९ फेब्रुवारी रोजी सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध करण्याचा नवा आदेश दिला.-------------------------हस्तक्षेपाला नकारतत्पूर्वी व्ही. गोपालगौडा यांच्या खंडपीठाने या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास नकार देत दिल्ली उच्च न्यायालयात बाजू मांडण्याचा आदेश मारन बंधूंना दिला होता. घटनेच्या कलम २२६ नुसार उपाय शोधल्यानंतर तुम्ही आमच्याकडे या. हा मूलभूत अधिकाराचा मुद्दा आहे असे आम्हाला वाटत नाही. आम्ही काही आदेश दिला तर प्रत्येक जण मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा मांडण्यासाठी आमच्याकडे येईल. आधीच आरोपपत्र दाखल झाले असताना आम्ही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. तुमच्यावर आरोप नसतील तर तुम्ही दोषमुक्त करण्याची मागणी कराल, असेही खंडपीठाने म्हटले होते.------------------आरोप फेटाळलादयानिधी मारन हे दूरसंचारमंत्री असताना २ जी स्पेक्ट्रमच्या एकाही परवान्याचे वाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे हे प्रकरण त्याच्याशी संबंधित नाही, असे सांगत मारनबंधूंचे वकील सी.ए. सुंदरम यांनी आरोप फेटाळून लावला. गेल्यावर्षी २९ ऑक्टोबर रोजी २ जी विशेष न्यायालयाने एअरसेल- मॅक्सिस सौद्याबाबत मारन बंधू आणि मलेशियन व्यावसायिक टी. आनंद कृष्णन यांच्यासह सहा जणांना समन्स पाठवून २ मार्च २०१५ पूर्वी न्यायालयात हजर होण्याचा आदेश दिला होता.