शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धांना अन्न सुरक्षेसाठी राष्ट्रीय धोरण सुधारा सुप्रीम कोर्टाचा आदेश : वृद्धाश्रमांसंबंधी कायदाही आता जुना झाला

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

नवी दिल्ली : देशभरातील वृद्धांना आर्थिक मदत, अन्नसुरक्षा, आरोग्यनिगा, निवारा आणि अन्य गरजा पुरविण्यासाठी राष्ट्रीय धोरणात सुधारणा घडवून आणा, असा आदेश सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिला आहे.

नवी दिल्ली : देशभरातील वृद्धांना आर्थिक मदत, अन्नसुरक्षा, आरोग्यनिगा, निवारा आणि अन्य गरजा पुरविण्यासाठी राष्ट्रीय धोरणात सुधारणा घडवून आणा, असा आदेश सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिला आहे.
वृद्धाश्रमांसाठी असलेले राष्ट्रीय धोरण १५ वर्षांपूर्वीचे असून १९९९ नंतर बरेच काही घडले असल्यामुळे त्यात सुधारणा घडवून आणण्याची गरज असल्याचे न्या. मदन बी. लोकूर आणि यू. यू. ललित या न्यायमूर्तीद्वयांच्या सामाजिक न्याय खंडपीठाने म्हटले.
२००७ मध्ये पालक आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा लागू करण्यात आल्यामुळे पूर्वीच्या तरतुदींमध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे. विकासात वृद्धांचा समान वाटा हवा. अत्याचारापासून रक्षण तसेच जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा घडविल्या जाव्यात. सामाजिक सुरक्षा, आंतरपिढीतील एकोपा, मूळ पालकाचा दर्जा देणारे कुटुंब, स्वयंसेवी संघटनांची भूमिका, मनुष्यबळ प्रशिक्षण आणि संशोधन यासारख्या सुविधांसाठी त्यांना सरकारने मदत द्यावी, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. वृद्धांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवले जात असून देशभरातील वृद्धांश्रमांचे सर्वेक्षण करून योग्य उपाययोजना करण्याचे आदेश सरकारला द्यावे, अशी विनंती वकील संजीव पाणीग्रही यांनी जनहित याचिकेत केली होती.(वृत्तसंस्था)
--------------------------------
सरकारच्या उत्तरावर नाराजी
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने दिलेल्या उत्तरावर न्यायाधीशांनी असमाधान व्यक्त केले. वृद्धाश्रम उभारण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली याची माहिती सरकारने दिली नसल्याकडेही लक्ष वेधले. यापूर्वी न्यायालयाने प्रत्येक जिल्ह्यात मूलभूत आरोग्य सेवा, सुविधा असलेल्या वृद्धाश्रमांची उभारणी केली जावी, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस पाठविली होती. वृद्धाश्रमांपुरती सिमित बाब पाहता आम्ही मेडिकल कौन्सिलला नोटीस पाठवणार नाही; मात्र आरोग्य मंत्रालयाला नोटीस पाठवत आहोत, असेही खंडपीठाने म्हटले होते.