शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाची मल्ल्यांना नोटीस!

By admin | Updated: July 26, 2016 01:55 IST

पूर्ण संपत्तीचा खुलासा न केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना नोटीस जारी केली आहे. भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाने याबाबत याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली : पूर्ण संपत्तीचा खुलासा न केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना नोटीस जारी केली आहे. भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाने याबाबत याचिका दाखल केली आहे. अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, ‘मल्ल्या यांनी आपल्या पूर्ण संपत्तीची माहिती दिलेली नाही. न्या. कुरियन जोसेफ आणि न्या. आर. एफ. नरिमन यांच्या खंडपीठासमोर मुकुल रोहतगी यांनी स्पष्ट केले की, मल्ल्या यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पूर्ण पालन केले नाही. त्यांनी ब्रिटनची मद्य कंपनी डिएगो यांच्याकडून मिळालेल्या चार कोटी ५० लाख डॉलरच्या रकमेचाही खुलासा केलेला नाही. ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने मल्ल्या यांना नोटीस जारी केली. तर बँकांच्या याचिकेवर चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. मल्ल्या यांच्याविरुद्ध अवमानाची कार्यवाही सुरू करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.’ रोहतगी यांनी १४ जुलै रोजी असा दावा केला होता की, मल्ल्या यांनी सर्वोच्च न्यायालयाला एका सीलबंद लिफाफ्यात आपल्या संपत्तीची चुकीची माहिती दिली आहे. रोहतगी यांचे असेही म्हणणे आहे की, मल्ल्या यांनी महत्त्वाची माहिती लपविली आहे. यात २५०० कोटी रुपयांच्या नगदी व्यवहारांचा समावेश आहे. ही माहिती लपविणे म्हणजे न्यायालयाचा अवमान करण्यासारखे आहे. यापूर्वी न्यायालयाने मल्ल्या यांना एका सीलबंद लिफाफ्यात त्यांच्या संपत्तीचे विवरण मागितले होते. बँकांच्या संघाने अलीकडेच असा आरोप केला आहे की, मल्ल्या त्यांच्याविरुद्धच्या चौकशीत सहकार्य करत नाहीत. आपल्या विदेशातील संपत्तीचीही माहिती देण्यास ते इच्छुक नाहीत. ही संपत्ती वसुलीसाठी महत्त्वाची ठरू शकते, असे बँकांचे म्हणणे आहे. मल्ल्या काय म्हणाले होते? मल्ल्या यांनी या पूर्वीच स्पष्ट केले आहे की, ते १९८८ पासून अनिवासी भारतीय असल्याने बँकांना त्यांच्या विदेशी चल अचल संपत्तीवर दावा करता येणार नाही.अनिवासी भारतीय असल्याने विदेशी संपत्तीचा तपशील देणे आवश्यक नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. पत्नी आणि तीन मुले अमेरिकी नागरिक असल्याने, त्यांनाही संपत्ती जाहीर करण्याची आवश्यकता नसल्याचे मल्ल्या यांनी म्हटलेले आहे.