शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

फाशी देण्याच्या पद्धतीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, केंद्र सरकारला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 04:42 IST

मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेलेल्याला शांतपणे मरण देण्यात यावे. त्याला फाशी देण्याच्या पद्धतीत वेदना नसावी, असे नमूद करीत, फाशी देण्याच्या पद्धतीला आव्हान दिलेल्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला शुक्रवारी नोटीस बजावली.

नवी दिल्ली : मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेलेल्याला शांतपणे मरण देण्यात यावे. त्याला फाशी देण्याच्या पद्धतीत वेदना नसावी, असे नमूद करीत, फाशी देण्याच्या पद्धतीला आव्हान दिलेल्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला शुक्रवारी नोटीस बजावली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. अजय खानविलकर आणि धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने या नोटिशीला तीन आठवड्यांत उत्तर मागितले आहे.अ‍ॅड. ऋषी मल्होत्रा यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये विधि आयोगाच्या १८७व्या अहवालाचा हवाला देण्यात आला आहे. त्या अहवालामध्ये फाशी देण्याच्या सध्याच्या पद्धतीला विरोध दर्शवलेला आहे. याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या निवाड्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या निवाड्यांत दोषीला फाशी देण्याच्या पद्धतीवर टीका करण्यात आलेली आहे.फौजदारी गुन्हा प्रक्रिया संहितेमध्ये मानेला फास देण्याच्या पद्धतीची तरतूद आहे. या तरतुदीच्या वैधतेलाही आव्हान दिले गेले आहे. दोषीला मरण शांतपणे आले पाहिजे. त्याला फाशी देत असताना वेदना होऊ नयेत, मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली असली तरी तो मनुष्य असल्यामुळे तो सन्मानाला पात्र आहे, असे न्यायालयाने या वेळी म्हटले.वेदनारहित मृत्यूची तुलना कशानेही होऊ शकत नाही, असे म्हटले जात आहे, असे न्या. मिश्रा म्हणाले. मृत्युदंडाच्या घटनात्मक वैधतेबद्दल आम्ही प्रश्न विचारत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तथापि, मृत्यूसाठी फाशीच्या पद्धतीचा फेरविचार करता येऊ शकेल? असा प्रश्न उपस्थित करीत, देशाची घटना ही करुणेचा दस्तावेज असून, त्यात बदलत्या काळाप्रमाणे कायद्याच्या लवचीकतेचे पावित्र्य मान्य केले आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.फाशी असावी की नसावी?अनेक देशांनी यापूर्वीच फाशीची शिक्षा रद्द केली आहे. फाशी ही अतिशय क्रूर शिक्षा आहे. फाशी दिल्यानंतर तो माणूस जिवंतच राहत नसल्याने त्याला सुधारण्याची संधीच मिळू शकत नाही, असा मोठा मतप्रवाह भारतासह अनेक देशांत आहे. तसेच अनेक देशांत गुन्हेगाराला वेदनारहित फाशी देण्याच्या पद्धतीही आहेत. मात्र काही देशांमध्ये फास आवळून मारण्यापेक्षाही अतिशय क्रूर पद्धतीने गुन्हेगारांना मारले जाते. त्या पद्धतीचा सर्वत्रच निषेध होत आला आहे. अर्थात या याचिकेत फाशी या शिक्षेला नव्हे, तर ती देण्याच्या पद्धतीलाच केवळ आव्हान देण्यात आले आहे.

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकार