शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचलच्या तिढ्यात सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप

By admin | Updated: January 28, 2016 01:11 IST

अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाची आता सर्वोच्च न्यायालय समीक्षा करणार आहे. ‘हा अतिशय गंभीर मुद्दा आहे,’ असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाची आता सर्वोच्च न्यायालय समीक्षा करणार आहे. ‘हा अतिशय गंभीर मुद्दा आहे,’ असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करणारे राज्यपाल ज्योतिप्रसाद राजखोवा यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेत राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतच्या अधिसूचनेला आव्हान देण्यात आलेले नाही, असा आक्षेप अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी घेतल्यानंतर न्या. जे.एस. केहार यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने वरीलप्रमाणे टिप्पणी केली. अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या शिफारशीवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी रात्री शिक्कामोबर्तब केले होते. ‘नियम हे शेवटी नियम आहेत आणि ते सर्वांना समान लागू आहेत,’ असे आग्रही प्रतिपादन रोहतगी यांनी केले तेव्हा, ‘तांत्रिक आक्षेप उपस्थित करू नका,’ असे घटनापीठाने त्यांना स्पष्टपणे सांगितले. निलंबनावस्थेत ठेवण्यात आलेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेतील काँगे्रस विधिमंडळ पक्षनेते राजेश ताचो यांच्यासह अन्य काँग्रेस नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्रालय आणि राज्यपाल राजखोवा यांना नोटीस जारी करीत शुक्रवारपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. घटनापीठाने सुनावणीसाठी १ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली.इटानगर : राज्यपालांनी शासनसूत्रे हाती घेतली. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याची अधिसूचना येताच राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांनी राज्य शासनाची सूत्रे हाती घेतली.