शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाचा आप सरकारला दणका!

By admin | Updated: July 9, 2016 02:46 IST

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य वादाबाबतच्या याचिकेवर सुनावणीला नकार देऊन आप सरकारला दणका दिला. घटनेच्या कलम २३९ अ अंतर्गत आपल्या अधिकारांची

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य वादाबाबतच्या याचिकेवर सुनावणीला नकार देऊन आप सरकारला दणका दिला. घटनेच्या कलम २३९ अ अंतर्गत आपल्या अधिकारांची व्याप्ती स्पष्ट करावी, अशी मागणी करणारी याचिका आप सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाने सुनावणी करून निर्णय राखून ठेवला. तेव्हा आपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. केंद्र व राज्य वाद उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येतात का, हा मुद्दा आधी सोडवावा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाला द्यावेत. उच्च न्यायालयाला आमच्या मुद्द्यांबाबत निर्णय देण्यापासून रोखावे व सर्वोच्च न्यायालयाने आमच्या अधिकारांची व्याप्ती स्पष्ट करावी, अशी मागणी आपने केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीस नकार देऊन दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरच आमच्याकडे या, असे दिल्ली सरकारला सुनावले. उच्च न्यायालयाला घटनात्मक मुद्द्यावर निर्णय देण्याचे अधिकार आहेत, असे सांगून न्या. दीपक मिश्रा आणि यू.यू. ललित यांनी आप सरकारची याचिका निकाली काढली. दिल्ली सरकारच्या वतीने बाजू मांडताना विधिज्ञ इंदिरा जयसिंग यांनी घटनात्मक तरतुदींचा ऊहापोह केला. दिल्लीत लोकनियुक्त सरकार असून, मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या सल्ल्यानुसार लेफ्टनंट गव्हर्नर यांना प्रशासन चालवावे लागते, हा या न्यायालयाचा निर्णय या प्रकरणात लागू होतो, असे नमूद करताना या वादावर केवळ सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते, असे जयसिंग यांनी नमूद केले. त्यावर खंडपीठ म्हणाले की, तुम्ही उच्च न्यायालयाचा दरवाजा का ठोठावला? तुम्ही घटनेच्या कलम २२६ अन्वये दिल्ली उच्च न्यायालयात गेला. आता उच्च न्यायालयाने या प्रकरणीचा निकाल राखून ठेवला. प्रत्येक न्यायालयाला त्याचे अधिकार क्षेत्र ठरविण्याचा अधिकार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘आप’च्या आणखी एका आमदारावर गुन्हाआम आदमी पार्टीचे (आप) देवळीचे आमदार प्रकाश जारवाल यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ग्रेटर कैलास पोलीस ठाण्यात जारवालविरोधात सदर महिलेने बुधवारी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जारवाल यांनी मला वाईट वागणूक देत माझा विनयभंग केला. आपचे आणखी एक आमदार दिनेश मोहनिया यांच्यावर त्यांनी महिलेवर हल्ला केल्याचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे.