शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाेच्च न्यायालयाने दिला डॉ. आंबेडकरांचा दाखला

By admin | Updated: August 28, 2014 02:22 IST

‘संपुआ’च्या पहिल्या सरकारमध्ये आरोपपत्र दाखल असलेल्या लालू प्रसाद यादव, मोहम्मद तसलिमुद्दीन, एम. ए. ए. फातमी आणि जय प्रकाश यादव या चार मंत्र्यांना सामील केले

नवी दिल्ली : ‘संपुआ’च्या पहिल्या सरकारमध्ये आरोपपत्र दाखल असलेल्या लालू प्रसाद यादव, मोहम्मद तसलिमुद्दीन, एम. ए. ए. फातमी आणि जय प्रकाश यादव या चार मंत्र्यांना सामील केले गेल्यानंतर २००५ मध्ये मनोज नरुला या वकिलाने केलेल्या जनहित याचिकेवर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी सदसद््विवेकाचा वापर करण्याची अपेक्षा ठेवणारा निकाल दिला गेला. त्यात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दाखलाही विशेषत्वाने दिला आहे. राज्यघटनेच्या मसुद्यावर घटनासभेत चर्चा सुरु असताना काही सदस्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला मंत्री होण्यास अपात्र ठरवावे, अशा दुरुस्त्या मांडल्या होत्या. परंतु राज्यघटनेच्या एकूणच रचनेत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना जे जबाबदारीचे अग्रगण्य स्थान दिले आहे ते पाहता मुद्दाम अशी तरतूद करणे अनावश्यक आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री संसद/ विधिमंडळास उत्तरदायी असतात व त्यांच्या कामावर जनतेचा जागता पाहरा असणार आहे. त्यामुळे या उच्च पदांवरील व्यक्ती पूर्ण जबाबदारीने वागतील अशी अपेक्षा ठेवून याविषयी विवेकपूर्ण निर्णय घेतील, अशी अपेक्षा ठेवायला हवी, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद केले होते. ‘कलंकित’ मंत्र्यांच्या बाबतीत राज्यघटनेची पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडून काय अलिखित अपेक्षा आहे, हे सांगताना न्यायालयाने डॉ. आंबेडकर यांच्या या मताचा दाखला दिला.खंडपीठात सरन्यायाधीश न्या. लोढा यांच्याखेरीज न्या. दीपक मिश्रा, न्या. शरद बोबडे, न्या. मदन लोकूर व न्या. कुरियन जोसेफ यांचा समावेश होता. न्या. मिश्रा यांनी स्वत: सरन्यायाधीश व न्या. बोबडे यांच्या वतीने ८८ पानांचे मुख्य निकालपत्र दिले. न्या. लोकूर व न्या. जोसेफ यांनी अनुक्रमे २७ आणि आठ पानांची सहमतीची पण स्वतंत्र निकालपत्रे लिहिली. मुख्य निकालपत्रात न्या. मिश्रा म्हणतात की, राज्यघटनेच्या अनुच्छेद ७५ व १६१ मध्ये मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी अथवा न करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मर्यादांचा अथवा अपात्रतेचा उल्लेख नाही. त्यामुळे गुन्हेगारी खटला सुरु असलेल्यांना मंत्री करू नका, असा आदेश देऊन न्यायालय राज्यघटनेत नसलेली अपात्रता अंतर्भूत करू शकत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)