शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

By admin | Updated: April 19, 2016 04:24 IST

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीला आव्हान देणारी जनहित याचिका खारीज केली आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवटीला आव्हान देणारी जनहित याचिका खारीज केली आहे. विधानसभेत शक्तिप्रदर्शनासाठी आमदारांचा घोडेबाजार सुरू असल्याबाबत सीबीआय चौकशीची मागणीही या याचिकेत केली होती. दुसरीकडे उत्तराखंडच्या उच्च न्यायालयाने राज्यपालांनी हस्तक्षेप करायला नको होता, या शब्दांत फटकारले आहे.२७ मार्च रोजी उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर काही तासांतच विधानसभेचे अध्यक्ष गोविंदसिंग कुंजवाल यांनी पक्षांतरबंदी कायद्यानुसार काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविले होते. त्याच दिवशी या आमदारांनी उच्च न्यायालयात अपात्रतेला आव्हान दिले. विधानसभा आधीच निलंबित असताना आणि कलम ३५६ लागू झाल्यानंतर या आमदारांना अपात्र ठरविण्याच्या कुंजवाल यांच्या कृतीबाबत वैधतेचा प्रश्न या आमदारांनी न्या. यू.सी. ध्यानी यांच्या एकलपीठाकडे उपस्थित केला होता.केंद्र सरकारने नऊ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविल्याची चिंता करणे तसेच केवळ अपवादात्मक परिस्थितीतच हस्तक्षेप केला जात असताना आवश्यकता नसताना तशी कृती करणे पूर्णपणे विसंगत ठरते, असेही उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले. २८ मार्च रोजी शक्तिपरीक्षा होऊ घातली होती तेव्हा नऊ आमदारांच्या बंडखोरीमुळे बदललेल्या परिस्थितीत काय घडते ते पाहणे हे केंद्र सरकारच्या हाती असताना एखाद्या राज्यात अन्य पक्षाचे सरकार असल्यामुळे बदलत्या परिस्थितीबाबत चिंता करणे हे पूर्णपणे विसंगत ठरत नाही काय, असा सवाल खंडपीठाने अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांना केला.अधिकारांवर अतिक्रमण नको... :विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मक अधिकारी असून राज्यपालांनी त्यांच्या स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करायला नको होते, असे उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के.एम. जोसेफ आणि न्या. व्ही. के. बिस्त यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. सोमवारी दिवसभर चाललेल्या सुनावणीनंतर खंडपीठाने म्हटले की, राष्ट्रपती, राज्यपाल यांच्यासारख्या घटनात्मक प्रमुखांच्या अधिकारांबाबत सीमारेषा आखून देण्यात आल्या आहेत. त्यांनी परस्परांच्या अधिकारांवर घाला घालू नये. मतविभाजनाबाबत आमदारांनी दिलेल्या निवेदनावर राज्यपाल के.के. पॉल यांनी विधानसभाध्यक्ष कुंजवाल यांना पत्र पाठवायचे टाळणे हेच चांगले राहिले असते.