पुरवठा अधिकारी निलंबित
By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST
कर्जत : कर्जत तहसील कार्यालयामधील पुरवठा अधिकारी एस. डी. महापुरे यांनी अनियमितता, निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी महापुरे यांना निलंबित केले आहे.
पुरवठा अधिकारी निलंबित
कर्जत : कर्जत तहसील कार्यालयामधील पुरवठा अधिकारी एस. डी. महापुरे यांनी अनियमितता, निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी महापुरे यांना निलंबित केले आहे. कर्जत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकुन एस. डी. महापुरे या तालुका पुरवठा अधिकार्याचे काम पहात होत्या. रेशनकार्ड वाटपातील जमा झालेल्या रकमेची अनियमितता, शिधापत्रिका, डाटा एन्ट्री काम पूर्ण न करणे, शिधापत्रिका संगणकीकरण मुदतीत पूर्ण न करणे, नव्याने वितरित करण्यात आलेल्या व रद्द केलेल्या शिधापत्रिकांची माहिती न देणे, पुरवठा विभागाचे सततचे असमाधानकारक काम, शासकीय कामात निष्काळजीपणा व हलगर्जीपणा करणे, वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे पालन न करणे, चुकीची माहिती देणे, नोटीशीचा खुलासा न करणे यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे पोटनियमानुसार जिल्हाधिकार्यांनी एस. डी. महापुरे यांना तात्काळ निलंबित केले आहे.