दिंड्यांना मुबलक गॅस सिलिंडरचा पुरवठा, पण विना अनुदानीत
By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST
दिंड्यासाठी ६५ हजार गॅस सिलिंडर व २ हजार ५२ लिटर रॉकलेचा पुरवठा करणार
दिंड्यांना मुबलक गॅस सिलिंडरचा पुरवठा, पण विना अनुदानीत
दिंड्यासाठी ६५ हजार गॅस सिलिंडर व २ हजार ५२ लिटर रॉकलेचा पुरवठा करणारपुणे: संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणा-या दींड्या यंदा विनाअनुदानित गॅस सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे. केंद्र शासनाने अनुदानित गॅस सिलिंडर मिळण्यासाठी ३० जून पर्यंत गॅस सिलिंडर बँक लिकींग करण्याची अखेरची मुदत दिली होती. पुणे, सातार, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ९० टक्क्यांपेक्षा अधिक दींड्याच्या मालकांनी अशा प्रकारे गॅस बँक लिकींग केलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे मात्र या दींड्यांना आता ६३९ रुपयांनी गॅस सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे. हा पुरवठा मुबलक प्रमाणात करण्याचे आदेश सर्व गॅस कंपन्यांना देण्यात आले असल्याची माहिती पुरवठा उपायुक्त प्रकाश कदम यांनी दिली. विठुरायाच्या भेटीला जाण्यासाठी दर वर्षी वेगवेगळ्या दींड्यांमध्ये सहभागी होऊन संपूर्ण राज्यातून लाखो भाविक पंढरपुरची वाट धरतात. उन्हा-वारा-पावसाची तमा न बाळगता लहान-थोर मंडळी पंधरा दिवासांचा प्रवास दींड्या सोबत करतात. यावेळी दींड्यात सहभागी असणा-या भाविकाची जेवण-खान्याची सोय करण्यासाठी दींड्यांना दर वर्षी मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडरची व रॉकेलची आवश्यकता असते. यंदा पुणे जिल्ह्यात संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सुमारे ६०० पेक्षा अधिक दींड्या सहभागी होणार आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील दींड्या पंधरा दिवसांसाठी २३ हजार गॅस सिलिंडर, सातारा जिल्ह्यासाठी २६ हजार गॅस सिलिंडर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी १६ हजार गॅस सिलिंडर लागताच असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु यातील अनेक दींड्यांच्या मालकांनी आपला गॅस सिलिंडर ३० जून पर्यंत बँक लिकीं केलेला नाही.ज्या लोकांनी बँक लिकींग केले आहे, त्यानाचा सध्या शासनाच्या अनुदानाचा लाभ देण्यात येतो. यामुळे या सर्व दींड्यांना एका सिलिंडरमागे सुमारे १९० रुपयांचा अधिकचा भुरदंड पडणार आहे.----रॉकेलचा पुरवठा करण्याचे दुकानदारांना आदेशशासनाकडे वेळोवेळी मागणी करुन देखील पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र रॉकेलचा पुरवठा केला जात नाही. यामुले प्रशासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विशेष नियोजन करुन येणा-या कोठ्यातून पालखी सोहळ्यात सहभागी होणा-या दिंड्यांना रॉकलेचा पुरवठा केला जातो. पुणे, सातार आणि सोलापूर जिल्ह्यातील दिंड्यांना सुमारे २ हजार ५२ लिटर रॉकलची मागणी असून, हा पुरवठा करण्याचे आदेश सर्व संबंधित रॉकेल दुकानदारांना देण्यात आले आहेत.दिंड्यांना असे मिळणार गॅस सिलिंडरपालखी सोहळ्यात सहभागी होणा-या दिंड्या विनाअनुदानीत म्हणजे ६३९ रुपये व प्रत्येक गॅस सिलिंडर साठी स्वतंत्र १४५० रुपये डिपॉझिट असे एकूण २०८९ रुपये मोजावे लागणार आहे. यामध्ये ज्या दिड्यांनी बँक लिकींग केले आहे त्यांना शासनाच्या अनुदान ११९ रुपये पुन्हा मिळणार आहे.