शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुरवणी लेख....-आ.वैभवराव पिचड, विधानसभा सदस्य ...........1

By admin | Updated: March 23, 2017 17:18 IST

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत २०१४ ची लाट ही कृत्रिम व जनतेची दिशाभूल करुन निर्माण केली होती. अण्णा हजारे यांचे आंदोलन,आम आदमी पाटीर्ची निर्मिती, दिल्लीतील निर्भया प्रकरण आणि प्रसार माध्यमांची भूमिका यातून निर्माण केली गेली आणि बिघडली ती सामान्य माणसांची डोकी व घडला एकदाचा बदल... पण त्सुनामीत आपलं अस्तित्व पूर्ण ताकदीनिशी टिकून ठेवले ते आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब या नावाच्या अदभुत रसायनाने आणि त्यामुळेच अकोले तालुक्याच्या जनतेने मला आमदार होण्याची संधी दिली.

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत २०१४ ची लाट ही कृत्रिम व जनतेची दिशाभूल करुन निर्माण केली होती. अण्णा हजारे यांचे आंदोलन,आम आदमी पाटीर्ची निर्मिती, दिल्लीतील निर्भया प्रकरण आणि प्रसार माध्यमांची भूमिका यातून निर्माण केली गेली आणि बिघडली ती सामान्य माणसांची डोकी व घडला एकदाचा बदल... पण त्सुनामीत आपलं अस्तित्व पूर्ण ताकदीनिशी टिकून ठेवले ते आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब या नावाच्या अदभुत रसायनाने आणि त्यामुळेच अकोले तालुक्याच्या जनतेने मला आमदार होण्याची संधी दिली.
अर्थात असं नव्हतं की, अकोले विधानसभा मतदारसंघात वादळवारं नव्हते, उलट मला पराभूत करण्यासाठी विविध पातळीवरुन प्रयत्न केले जात होते. कोठे शत प्रतिशत, कोठे अब की बार, कोठे धनुष्यबाण, कोठे गद्दारी, कोठे बाह्य हस्तक्षेप अशा पध्दतीने माझ्या विरोधात विरोधक रान उठवित होते. टोकाचा विरोध करुन मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करीत होते. माझा विजय निश्चित सोपा नव्हता. विरोधकांना पिचड घराण्याचा कायमस्वरुपी पराभव सतत दिसतो तर पिचड घराण्यांवर प्रेम करणार्‍या अठरा पगड जातीच्या, आदिवासी जमातीच्या माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, युवकांना, जेष्ठ नागरिकांना पिचड यांचा जय-विजयच दिसतो आणि हेच गमक आहे माजी मंत्री पिचड साहेबांच्या विचारात व कार्यप्रणालीत.
समाज जीवनात आदरणीय साहेबांचा सक्रियतेचा काळ जवळपास अर्धशतकाचा असेल. पंचायत समितीचे सभापती, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इत्यादी वेळोवेळी मिळालेल्या पदांचा वापर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी, आदिवासी समाजाचा विकास व न्याय हक्कासाठी, तालुक्यातील जनतेसाठी, तालुक्याच्या पाणी प्रश्नांसाठी शिक्षणासाठी, रस्ते व दळणवळण सुविधांसाठी, निळवंडे, आंबीत, पिंपळगाव खांड, सांगवी, बलठण, शिरपुंजे, कोथळे, पाडोशी आदि धरण शृंखलेच्या निर्मितीसाठी, प्रकल्पग्रस्तांच्या आदर्श पुनर्वसनासाठी, दुग्ध पंढरीसाठी, तालुक्याची कामधेनू असलेल्या अगस्ती कारखान्यासाठी, राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प करण्यासाठी, राष्ट्रीय पातळीवर आदिवासीचे संघटन व्हावे यासाठी, मुस्लीम समाजाच्या आरक्षणासाठी, पाणीप्रश्नावरील तसेच शेतकर्‍यांच्या आंदोलनासाठी व उन्नतीसाठी, आदिवासी समाजात झालेल्या बोगस आदिवासींच्या घुसखोरींच्या विरोधासाठी, तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी, वीज प्रकल्पांची निर्मिती व तालुक्यात वीजवितरणाचे जाळे निर्माण करण्यासाठी अशा विविध कामांसाठी त्यांनी केला.