शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

संडे स्पेशल- अनुज अलंकार

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

हसणे हा अपराध कसा!

हसणे हा अपराध कसा!

विनोदाच्या नावाखाली अश्लीलता आणि बीभत्सतेची पातळी गाठलेल्या एआयबी नॉकआऊटबद्दलचे वाद वाढतच चालले आहेत. या कार्यक्रमात सामील झालेल्यांविरोधात मुंबईतील वकील आभा सिंह यांनी याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी एफआयआर तक्रार दाखल केली आहे. एकूण १४ जणांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारीविरोधात ज्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे त्यात ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांचे नाव सर्वात पुढे आहे. एआयबी कार्यक्रमात भट यांची पत्नी सोनी राजदान आणि मुलगी आलिया भट यांनीही हजेरी लावली होती. तर संपूर्ण कार्यक्रमाला तिकीट खरेदी करून चार हजार प्रेक्षक आले होते. मात्र फक्त काहीच प्रेक्षकांविरोधात अशी तक्रार दाखल करणे कितपत सुसंगत आहे हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
करण जोहर, अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह हे कार्यक्रमाचे सूत्रधार असले तरी दीपिका, आलिया, सोनाक्षी अशा अभिनेत्री त्यांच्या अश्लील जोक्सना मात्र खळखळून हसत होत्या. त्यांचे अशा प्रकारचे हसणे हा अपराध कसा असू शकतो? फक्त अभिनेत्री नाही तर या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्वच प्रेक्षक असे हसत होते. त्यामुळे फक्त या लोकांविरोधात तक्रार करण्याबरोबरच पूर्ण एआयबी कार्यक्रमाविरोधात तक्रार करायला हवी. नंतर त्यांच्यावर योग्य कारवाई करत एआयबी टीमबरोबरच या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणार्‍या करण जोहर, अर्जुन कपूर, रणवीर सिंह, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर सहभागी झालेल्या सर्वांविरोधात अशी तक्रार करणे जास्त श्रेयस्कर ठरेल. मात्र अशा प्रकारच्या अश्लील विनोदांना अभिनेत्री हसत आहेत हे जरी खुपणारे असले तरी तो अपराध होऊ शकत नाही हेही सत्य आहे. त्यामुळे या अभिनेत्री तसेच इतर प्रेक्षकांविरोधात तक्रार करण्याचे कारण नाही.
हे प्रकरण कायद्याच्या दृष्टीने तेवढे दमदार नसल्याचे आधीपासूनच सांगितले जात आहे. एफआयआर दाखल केल्यानंतर अटक होतेच पण जामीन मिळायलाही वेळ लागत नाही. आपल्या टिष्ट्वटमध्ये यासंदर्भात सोनाक्षी म्हणते की, हसणे हा काही अपराध असू शकत नाही. म्हणजेच आपल्या देशाचा कायदा या कार्यक्रमात पाहुणी म्हणून सहभागी झाल्याबद्दल तुरुंगात पाठवू शकत नाही हे तिला चांगलेच माहिती आहे. ही बाब दीपिका आणि आलियाबाबतही लागू होते. म्हणजेच हसणे आणि कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणे हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे.
व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली मात्र या देशात काहीही खपवून घेतले जाणार नाही हेही तितकचे खरे. त्यामुळे यात सहभागी झालेल्या कलाकारांवर सार्वजनिकरीत्या बहिष्कार घालत त्यांच्या चित्रपटांना फारसे महत्त्व न देणे अशा अनेक गोष्टी करत प्रेक्षकांनीच त्यांना शिक्षा देणे जास्त योग्य ठरेल.

महेश भ˜ आणि सोनाक्षी सिन्हात वाद
तक्रार दाखल केलेल्यांमध्ये करण जोहर, अर्जुन कपूर, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, आलिया भट यांच्याबरोबर सोनाक्षी सिन्हा उपस्थित राहूनही तिच्याविरोधात तक्रार दाखल न झाल्याने ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक महेश भ˜ वैतागले आहेत. यासंदर्भात सोशल नेटवर्किंग साइटवर भट यांनी सोनाक्षीचे नाव नसण्यावरून पक्षपाताचा आरोप केला आहे. कार्यक्रमात दीपिका पदुकोण, आलियासोबत सोनाक्षीही होती. पण भाजपाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलीचे तक्रारीत नाव नसल्याचे पाहून हैराण झालो, असे त्यांनी म्हटले आहे. या आरोपामुळे भडकलेल्या सोनाक्षीने कोलकाता आणि दिल्लीतही एफआयआर तक्रारी दाखल झाल्या होत्या. पण त्यात माझे नाव समाविष्ट होते तर आलियाविरोधात तक्रार नव्हती. त्या वेळी माझे वडील याविरोधात काही बोलले नाहीत, असे म्हटले. तसेच चार हजार प्रेक्षकांमध्ये फक्त काही लोकांच्या विरोधातच का एफआयआर तक्रार दाखल केली गेली, असा प्रश्नही सोनाक्षीने उपस्थित केला.