संडे पान ६ म्हापशात हिंदुत्ववादी संघटनेतर्फे आज निदर्शने
By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST
बार्देस : समस्त हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली म्हापसा नगरपालिकेच्या मुख्य द्वाराजवळ रविवार, दि. १५ रोजी सकाळी ११ वा. निदर्शने करणार आहे.
संडे पान ६ म्हापशात हिंदुत्ववादी संघटनेतर्फे आज निदर्शने
बार्देस : समस्त हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली म्हापसा नगरपालिकेच्या मुख्य द्वाराजवळ रविवार, दि. १५ रोजी सकाळी ११ वा. निदर्शने करणार आहे. प्राणिमित्र अमृतसिंग आणि गोवंश रक्षा अभियानचे हनुमंत परब यांच्यावरील हल्ल्याचा निषेध, या प्रकरणातील दोषींना त्वरित अटक करणे, अल्पसंख्याकत्वाची टक्केवारी निित करणे, समान नागरिक कायदा करणे, गोध्रा हत्याकांडाचा दिवस म्हणून २७ फेब्रुवारी काळा दिवस पाळणे आदी मागण्यांना अनुसरून हे आंदोलन होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.देशव्यापी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा हा एक भाग आहे. समस्त हिंदंूनी या निदर्शनामध्ये सहभागी होऊन हिंदू ऐक्याचा आविष्कार दाखवावा, असे आवाहन राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)