लॉस एंजल्स : बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याविरोधात अमेरिकेतील एका न्यायालयाने समन्स काढले आहे. अमेरिकेतील शीख हक्क संघटनेने 1984 च्या दंगलीप्रकरणी अमिताभ यांच्यावर मानवी हक्क भंगाचा आरोप केला आहे.
न्यूयॉर्कमधील शीख फॉर जस्टिस ही संघटना व दोन कथित दंगलग्रस्त यांनी अमिताभ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. बाबूसिंग दुखिया (दिल्ली) व मोहंदरसिंग ( कॅलिफोर्निया) अशी दंगलपीडीतांची नावे आहेत. अमिताभ यांना समन्स पोहचल्यानंतर त्यानी 21 दिवसात जबाब द्यावा असे न्यायालयाचे आदेश आहेत. हे समन्स 35 पानाचे असून त्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर अमिताभ यांनी लोकांना हिंसाचार करण्यास प्रवृत्त केले असा आरोप आहे. गेल्या काही वर्षात या संघटनेने अनेक भारतीय नेत्याना अमेरिकन न्यायालयात ओढण्याचे अयशस्वी प्रय} केले. (वृत्तसंस्था)