सारांश जोड
By admin | Updated: February 16, 2015 02:02 IST
समाजसेवा शिबिराचे आयोजन
सारांश जोड
समाजसेवा शिबिराचे आयोजननागपूर : मोमीनपुरा येथील डॉ. जाकिर हुसेन उर्दू डी. टी. एड. कॉलेजमध्ये वार्षिक समाजसेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव हाजी तुफैल अशर यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य एम. जे. वाघमारे यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हाजी सलीम अहमद होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, माजी प्राचार्य प्रा. अनिल शर्मा, रफिक अहमद, कफिल अजहर उपस्थित होते. भगवतीदेवी विद्यालयाचे स्नेहसंमेलननागपूर : भगवतीदेवी चौधरी प्राथमिक विद्यालय आणि शिशुमंदिराच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव केचे यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मुकुंद कानिटकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून छगन पटेल उपस्थित होते. कार्यक्रमाला संस्थेचे सहकार्यवाह वामन जोशी, मधुकर उदापुरे, विजय देव, गोपाल तिवारी उपस्थित होते. सरदार भोलासिंग नायक विद्यालयाचे सुयशनागपूर : सरदार भोलासिंग नायक विद्यालय हिवरीनगरच्या १३ विद्यार्थ्यांनी ब्रह्मपुरी येथे झालेल्या आंतरशालेय कराटे स्पर्धेत सहभाग घेतला. यातील ३ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, एका विद्यार्थिनीला रजत पदक, ५ विद्यार्थ्यांना कांस्यपदक आणि प्रमाणपत्र तसेच शाळेला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संजयकुमार चिकनकर, शिक्षक देवीचंद चव्हाण, शुभांगी प्रेमलकल यांचे मार्गदर्शन लाभले. चिरायु के. सी. बजाज अध्यापक महाविद्यालयाचा क्रीडा महोत्सवनागपूर : चिरायु के. सी. बजाज अध्यापक महाविद्यालय आणि श्रीमती कौश्यादेवी बजाज अध्यापक विद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन कोषाध्यक्ष डिम्पी बजाज यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. सोनाली भारद्वाज, क्रीडा विभागप्रमुख प्रा. एस. राखडे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सोनाली भारद्वाज यांनी केले. संचालन प्रा. मोहतिसा इमरान यांनी केले. आभार प्रा. जवाहर वैद्य यांनी मानले. बालनाट्य स्पर्धेत नारायणा विद्यालयाचे सुयशनागपूर : भारतीय विद्याभवन सिव्हिल लाईन्सतर्फे आंतरशालेय बालनाट्य स्पर्धेत नारायणा विद्यालय चिंचभुवनच्या नाटकाला पाच विशेष पारितोषिक मिळाले. स्पर्धेत विद्यालयाला निर्मिती, उत्कृष्ट पटकथा, प्रकाश व्यवस्था, उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. पटकथालेखन, रश्मी पानसरे यांनी केले. त्यांना अंजली खेर, संजीवनी हातवळणे, मीना शुक्ला, अंकिता जांगळेकर, जगदीश वानखेडे, अतुल ठाकरे यांनी मदत केली. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य माला चेंबथ यांना दिले.