सारांश...
By admin | Updated: July 26, 2015 23:38 IST
कोषागार विभागाच्या तत्परतेमुळे वेतननागपूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात काम करणाऱ्या मजुरांचे तीन महिन्याचे वेतन थकीत होते. शासनाकडून निधी उशिरा प्राप्त झाला होता. हा निधी प्राप्त होताच कोषागार विभागाकडे वेतन देयके पाठविण्यात आली. मजुरांची अडचण विचारात घेता विभागातील अधिकाऱ्यांनी तत्परतेने एक तासात दयके पारित केल्याने थकीत वेतन मिळाले....कार्यालयाच्या सजावटीसाठी ...
सारांश...
कोषागार विभागाच्या तत्परतेमुळे वेतननागपूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात काम करणाऱ्या मजुरांचे तीन महिन्याचे वेतन थकीत होते. शासनाकडून निधी उशिरा प्राप्त झाला होता. हा निधी प्राप्त होताच कोषागार विभागाकडे वेतन देयके पाठविण्यात आली. मजुरांची अडचण विचारात घेता विभागातील अधिकाऱ्यांनी तत्परतेने एक तासात दयके पारित केल्याने थकीत वेतन मिळाले....कार्यालयाच्या सजावटीसाठी एक कोटीनागपूर : महापालिकेच्या नवीन इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरील अंतर्गत सजावटीसाठी १ कोटी ८ लाखाचा खर्च करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने सजावट व फर्निचरचे काम मागील काही महिन्यापासून रखडले आहे. आता ते मार्गी लागण्याची आशा आहे....ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव रखडलानागपूर : पावसाळयाच्या दिवसात रेल्वे स्टेशनवर पाणी साचते. यामुळे रेल्वेगाड्यांना विलंब होण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेता येथील पाणी वाहून जाण्यासाठी साडेचार कोटीचा ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. यात मनपाचा ७० टक्के तर रेल्वेचा ३० टक्के वाटा राहणार होता. परंतु मागील काही वर्षापासून हा प्रस्ताव रखडला आहे. ...डासांचा त्रास वाढलानागपूर : शहराच्या विविध भागात डासांचा त्रास वाढला आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे असल्याने व पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. याला आळा घालण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाने उपाययोजना करावी, अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे.