सारांश
By admin | Updated: September 11, 2015 21:24 IST
आसिफ खान यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
सारांश
आसिफ खान यांना आदर्श शिक्षक पुरस्कारजळगाव - अलफैज फाउंडेशनच्या अलफैज उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक पठाण आसिफ खान युसुफ खान यांना अखिल भारतीय लेवा विकास महासंघ व सरदार पटेल बहुद्द्ेशीय संस्था व युवा विकास फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजीज सालार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.करीम सालार, मुश्ताक सालार, शेख शाहिद, खजिनदार मोहम्मद रफिक, जावेद शेख, इफ्तेकार अहमद, उपशिक्षक आसिम अहमद, तौफिक शेख, शेख नवाब, आयेशा खान, वर्षा तडवी, खान जुबेर अहमद, जमील खान, रिजवान शेख यांनी सत्कार केला. श्रीनिवास कॉलनीत उद्यानाचे लोकार्पणजळगाव : खासदार ए.टी. पाटील यांच्या खासदार निधीतून श्रीनिवास कॉलनीत उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उद्यानाचे पुजन महापालिकेतील विरोधी पक्ष नेते वामन खडके यांनी केले. यावेळी सभापती ज्योती चव्हाण, भाजप गटनेते अश्विन सोनवणे, उज्ज्वला बेंडाळे, पांडुरंग काळे, सुनील माळी, सिमा भोळे, अतुलसिंह हाडा, प्रकाश बालाणी, किशोर वाघ, वंदना पाटील, प्रविण महाजन व नागरिक उपस्थित होते.बागबान फाउंडेशनतर्फे खंडेराव नगरात आरोग्य तपासणीजळगाव : बागवान विकास फाउंडेशनतर्फे खंडेराव नगरात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. गरजू रुग्णांना मोफत औषधी वाटपही करण्यात आले. यावेळी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप पाटील उपस्थित होते. या शिबीरात डॉ.जगमोहन छाबडा यांनी रुग्णांची मोफत तपासणी केली. हस्ती बँक आणि जळगाव पिपल्स बँकेतर्फे बचत खाते उघडून पंतप्रधान जीवन सुरक्षा वीमा योजनेत सहभागी करून घेण्यात आले. यावेळी हस्ती बँकेचे व्यवस्थापक सचिन शाह व पीपल्स बँकेचे अतुल जोशी, रऊफ बागवान, डॉ.शरीफ शेख, आबा कापसे, बापु साळवे, कुलभूषण पाटील, नजिम बागवान, सय्यद युनुस, इरफान बागवान, उपस्थित होते. जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वाला उत्साहात सुरुवातजळगाव : जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वाला गुरुवारी सुरुवात झाली. आठ दिवस चालणार्या या सोहळ्यासाठी जळगावातील जैन मंदिरे सजवण्यात आली आहेत.नवीपेठेतील वासुपुज्य मंदिर, धर्मना स्वामी जैन मंदिर, भाग्यवर्धन पार्श्वनाथ जैन मंदिर, जिनकुशल सुरी या मंदिरांना रोषणाई करण्यात आली आहे. या निमित्ताने कल्पसूत्राचे वाचन रविवारी करण्यात येईल. महावीर भगवानांचे जन्म वाचन १४ रोजी होईल. तसेच बारसा सूत्र वाचन गुरुवारी १७ रोजी होणार आहे.