शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

सारांश

By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST

अ.भा. माळी महासंघाच्या प्रयत्नांना यश

अ.भा. माळी महासंघाच्या प्रयत्नांना यश
नागपूर : महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना संयुक्त भारतरत्न देण्यासाठी अ.भा. माळी महासंघाने मागणी केली होती. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला असून, केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अ.भा. माळी महासंघ, महात्मा फुले शिक्षण संस्था, विदर्भ माळी कल्याणकारी मंडळ, संत सावता बहुउद्देशीय संस्था आदी संघटनांनी मुख्यमंत्र्यांप्रति आभार व्यक्त केले आहे.
पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. आजपर्यंत रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास कार्यालयाने अनेकवेळा कागदपत्रे मागितली परंतु निर्णय झाला नाही. त्यामुळे पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघर्ष समितीचे अध्यक्ष रणजित सोमकुवर, सचिव संजय लिखितकर, राजकुमार फुलझेले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ओंकारनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नागपूर : ओंकारनगरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ओंकारनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुनील अडगावकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे संजय चिडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साकेत धार्मिक, धवन रेंगे, आदिती जुमळे, आयुषी जुमळे, श्रेया बोबडे, अभिषेक अंधारे, तुषार तायवाडे यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेच्या ऑटो स्टॅण्डचे उद्घाटन
नागपूर : महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख आशिष मनपिया यांच्या नेतृत्वात संघर्षनगर येथे महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेतर्फे ऑटो स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सतीश बोकडे, मनीषा कार्लेकर, दिलीप पाल, अलका दलाल, गौरव गुप्ता, रंजना देशमुख, रजत देशमुख, श्वेता मेश्राम, पायल भनारकर, स्वप्नील मुळे, मंगेश खडके, किशोर विरुळकर, विनय गुप्ता, श्याम चौधरी, विशाल सावते, कल्ला नायक, वसीम खान आदी उपस्थित होते.
वाढीव वेतनासाठी एस.टी. अप्रेन्टिस संपावर
नागपूर : सरकारच्या शासकीय अध्यादेशाप्रमाने राज्यातील शासकीय व निमशासकीय उद्योगामध्ये शिकावू कामगारांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात आली आहे. परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विद्यावेतनात वाढ केली नाही. त्यामुळे शिकावू कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय अध्यादेशाप्रमाणे वेतनवाढ लवकरात लवकर देण्यात यावी, या मागणीसाठी शिकावू कामगार तीन दिवसांच्या संपावर आहेत.