शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सारांश

By admin | Updated: June 12, 2015 17:37 IST

वीज कामगार संघर्ष प्रचार यात्रेचा समारोप

वीज कामगार संघर्ष प्रचार यात्रेचा समारोप
नागपूर : वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व प्रश्नावर तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने १ ते १० जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात वीज कामगारांची संघर्ष प्रचार यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेचा समारोप विद्युत भवन येथे झाला. समारोपाला आयोजित करण्यात आलेल्या सभेत मोहन शर्मा, सी. एम. मौर्य, अब्दुल सादिक आदींनी मार्गदर्शन केले.
भाजपाच्या नेत्यांविरुद्ध निदर्शने
नागपूर : पूर्व नागपुरात अनाधिकृत लेआऊटची समस्या आहे. अनेक वस्त्यांमध्ये रस्ते, पाणी, शौचालयाची व्यवस्था नाही. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे. निवडणुकीनंतर ते भटकलेसुद्धा नाही. त्यामुळे राजीव गांधी विचार मोर्चातर्फे भाजपा नेत्यांच्या विरुद्ध निदर्शने करण्यात आलीत. यावेळी अनिल पांडे, नाना असलम, रवींद्र बोरकर, रवी हिंदुस्तानी, अमित अवचट आदी उपस्थित होते.
नागरिकांनी घ्यावी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी
दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी सरकारबरोबर लोकांचीही आहे, असे मत वनराई फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितीत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पिनाक दंदे, ॲड. निशांत गांधी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.
स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
नागपूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि युथ कला निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने युवक-युवतींसाठी स्वयंरोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम जगताप होते. प्रमुख पाहुणे नारायण घोरे, योगेश काकडे, रंजना राखडे, अशोक येळणे, राजेश गोडे उपस्थित होते. शिबिरात लघु उद्योगाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
प्रियदर्शनी महाविद्यालयात पर्यावरण दिन साजरा
नागपूर : प्रियदर्शनी जे. एल. महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. अभय शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वांनी खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन डॉ. शेंडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.