सारांश
By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST
सारांश
सारांश
सारांश ओंकारनगर जलकुंभावरून उद्या पाणीपुरवठा बंद नागपूर : ओंकारनगर जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा २० फेब्रुवारी रोजी देखभाल दुरुस्तीचे दिवसभर काम चालणार आहे. त्यामुळे जोगीनगर, साकेतनगर, भीम गल्ली १ ते १४, पार्वतीनगर गल्ली १ ते ५, जयभीमनगर गल्ली १ ते ५, नवीन बाभूळखेडा, टोली, शताब्दीनगर, धाडीवाल ले-आऊट, रमानगर, रामेश्वरी, द्वारकापुरी, काशीनगर, बॅनर्जी ले-आऊट, भगवाननगर, कैलाशनगर, बालाजीनगर, कुंजीलालपेठ, त्रिशरण चौक, हावरापेठ आदी वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. सुविचार प्रश्नमंजुषा स्पर्धा नागपूर : हनुमान मंदिर श्रीकृष्णनगर येथे सुविचार प्रश्न मंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. मोहनराव परसोडकर अध्यक्षस्थानी होते. विजय बालकोटे, विठ्ठल पराते प्रमुख अतिथी होते. भाऊ रोटकर यांनी प्रास्ताविक केले.