सारांश
By admin | Updated: February 7, 2015 02:04 IST
अनिल राऊत कारागृहातनागपूर : बेसा रेवतीनगर येथील नरेंद्र पिंपळीकर याच्या खूनप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. व्ही. ढोरे यांच्या न्यायालयाने आरोपी अनिल ऊर्फ अण्णा भय्याजी राऊत याला न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्याची कारागृहाकडे रवानगी केली. कुर्वेज न्यू मॉडेलला आंतरराष्ट्रीय पदकेनागपूर : श्रद्धानंदपेठ येथील कुर्वेज न्यू मॉडेल पब्लिक स्कूलला १७ व्या ...
सारांश
अनिल राऊत कारागृहातनागपूर : बेसा रेवतीनगर येथील नरेंद्र पिंपळीकर याच्या खूनप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. व्ही. ढोरे यांच्या न्यायालयाने आरोपी अनिल ऊर्फ अण्णा भय्याजी राऊत याला न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्याची कारागृहाकडे रवानगी केली. कुर्वेज न्यू मॉडेलला आंतरराष्ट्रीय पदकेनागपूर : श्रद्धानंदपेठ येथील कुर्वेज न्यू मॉडेल पब्लिक स्कूलला १७ व्या एसओएफ इंटरनॅशनल ऑलम्पियाड परीक्षेत ९ सुवर्ण, ७ रौप्य आणि ७ कास्य पदके प्राप्त झाली. अथर्व निनावे, वात्सल्य महातो, अर्श बरडे, अक्षद, समृद्धी द्विवेदी, पार्थ लांजेवार, रिद्धी हेडाऊ, अमेय धोटे आणि आशुतोष कराडे यांना सुवर्ण, अथर्व रोकडे, अपूर्वा वाडेकर, अर्जुन येनूरकर, परिवर्तन ठवरे, पार्थ वांदे, देवदत्त बिडकर आणि पुष्कर देवतळे यांना रौप्य तर सोहम वनेरकर, दियांशी अग्रवाल, वैभवी, अर्श विश्वकर्मा, हर्षिता श्रीवास्तव, साक्षी रोकडे आणि नचिकेत रोवला यांना कास्य पदके प्राप्त झाली. लोकमान्य टिळक शाळेत स्नेहसंमेलननागपूर : दत्तवाडी इंद्रायणीनगर येथे लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा, लोकमान्य कॉन्व्हेन्ट आणि वैशाली मुलींच्या वसतिगृहाच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसम्मेलन पार पडले. कार्यक्रमात वाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुरलीधर करपे, शिक्षणतज्ज्ञ प्रा. सुभाष खाकसे, उपसभापती सुजित नितनवरे आदी उपस्थित होते. तिडके महाविद्यालयाचे शिब्िीरनागपूर : भीमनगर आदिवासी झोपडपट्टी येथे तिडके महाविद्यालयाच्या वतीने प्रा. मुरलीधर वाकोडे आणि प्रा. मधुकर बागडे यांच्या नेतृत्वात सात दिवसांचे राष्ट्रीय सेवा योजन शिबीर पार पडले. स्वयंसेवकांनी साफसफाई करून स्वच्छतेचे महत्व नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले. रंजना पवार, प्राचार्य श्याम निकोसे, भास्कर डोकरीमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लिटिल एंजल कॉन्व्हेन्टचे स्नेहसम्मेलननागपूर : सुगतनगर येथील लिटिल एंजल कॉन्व्हेन्टचे स्नेहसम्मेलन पार पडले. उद्घाटन हरिदास टेंभुर्णे यांनी केले. विनय रोडगे यांनी विद्यार्थ्यांना बक्षीसे वितरित केली. संचालन अस्मिता रोडगे तर आभार मुख्याध्यापिका इंदिरा साखरे यांनी मानले.