शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

संधिसाधूंचा सुकाळ....... ( कारण... राजकारण... शहर विशेष... स.सो.खंडाळकर)

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

तसं तर राजकारण संधिसाधूंचंच म्हटलं जातं. निष्ठावान वा ध्येयनिष्ठांचं ते काम नाही. हे निष्ठावान व ध्येयनिष्ठ जिथल्या तिथंच राहतात. किंबहुना ते नेहमीच मागे पडलेले बघावयास मिळतात आणि ज्यांनी संधी साधली, ते कुठल्या कुठे पोहोचलेले दिसून येतात. औरंगाबादच्या राजकारणात सध्या संधिसाधूंचा सुकाळ बघावयास मिळत आहे. हा सारा प्रकार किळसवाणा वाटल्याशिवाय राहत नाही; पण यालाच तर राजकारण म्हटलं जातं. आगामी काळातील औरंगाबाद महापालिकेची निवडणूक हे या संधिसाधू राजकारणाचं मूळ होय. किमान वॉर्डातील तिकिटाची का होईना हमी घेऊन हे संधिसाधू राजकारण केलं जात आहे. काही जणांना पैसे प्रिय असतात, हा प्र्रकार पुन्हा वेगळा. हे सगळं करताना कुणाला त्याची लाजही वाटत नाही.

तसं तर राजकारण संधिसाधूंचंच म्हटलं जातं. निष्ठावान वा ध्येयनिष्ठांचं ते काम नाही. हे निष्ठावान व ध्येयनिष्ठ जिथल्या तिथंच राहतात. किंबहुना ते नेहमीच मागे पडलेले बघावयास मिळतात आणि ज्यांनी संधी साधली, ते कुठल्या कुठे पोहोचलेले दिसून येतात. औरंगाबादच्या राजकारणात सध्या संधिसाधूंचा सुकाळ बघावयास मिळत आहे. हा सारा प्रकार किळसवाणा वाटल्याशिवाय राहत नाही; पण यालाच तर राजकारण म्हटलं जातं. आगामी काळातील औरंगाबाद महापालिकेची निवडणूक हे या संधिसाधू राजकारणाचं मूळ होय. किमान वॉर्डातील तिकिटाची का होईना हमी घेऊन हे संधिसाधू राजकारण केलं जात आहे. काही जणांना पैसे प्रिय असतात, हा प्र्रकार पुन्हा वेगळा. हे सगळं करताना कुणाला त्याची लाजही वाटत नाही.
सध्या भाजपमध्ये जाण्याची टूम दिसते. भाजपमध्ये जाणार्‍यांना उद्या हाफ चड्डीतही दिसावं लागेल, याचं भान नाही. भान कशाला हवं? तेही करण्याची तयारी राहील. हाफ काय आणि पूर्ण चड्डी काय? आचार आणि विचार याची जीवनात सुसंगती नसते, तेव्हा कुणी कसाही भरकटतो आणि स्वार्थ साधतो, हेच यातलं अंतिम सत्य. कालचे काँग्रेसवाले आज भाजपवाले होतात, याला काय म्हणायचं? विचाराच्या पातळीवर मग काय फरक राहिला? भाजपसुद्धा काँग्रेस व्हायच्या मार्गावर आहे, हेच खरं!
ज्या भाजपला पूर्वी सर्रासपणे जातीय पक्ष म्हणून नावं ठेवली जायची, तोच भाजप आज या संधिसाधूंना कमालीचा गोड वाटत आहे. कारण तो देशाच्या आणि राज्याच्या सत्तेत आहे; पण त्यांनाही कुणीतरी केजरीवाल मध्येच भेटतो आणि तो पानिपत करीत असतो, हेही लक्षात ठेवण्यासारखी आजची परिस्थिती आहे. मोदीची लाट आहे असं म्हणत ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात काही नगरसेवक त्याच वेळी भाजपवासी झाले. आता पुन्हा आणखी सहा नगरसेवक भाजपवासी झाले. जुनं लग्न मोडून आज लगेच भाजपचं कुंकू लावायला तयार! म्हणजे त्या लग्नाला काही अर्थच नाही. असं सगळं आचारहीन व विचारहीन होत असताना भाजपलाही वाटायला लागलंय की आता आपली ताकद खूप वाढायला लागली. आपण मोठे भाऊ व्हायला लागलोत; पण गद्दार ते गद्दारच असतात. आज इकडे तर उद्या तिकडे. फक्त स्वार्थ साधला गेला पाहिजे. अन्यथा ते कुणाच्याही तोंडावर थुंकायला तयार! आज भाजपमध्ये चाललेल्यांना उद्या पुन्हा काँग्रेस सत्तेत यायला लागली अशी चाहूल लागायला उशीर... टुणकन पुन्हा काँग्रेसमध्ये उडी!