विद्यार्थिनीसह दोघांची आत्महत्या
By admin | Updated: December 13, 2015 00:07 IST
विद्यार्थिनीसह दोघांची आत्महत्या
विद्यार्थिनीसह दोघांची आत्महत्या
विद्यार्थिनीसह दोघांची आत्महत्या नागपूर : विद्यार्थिनीसह दोघांनी आत्महत्या केली. निर्मल नगरी येथील १९ वर्षीय लक्ष्मी भारत भोयर हिने शुक्रवारी सायंकाळी गळफास घेतला. लक्ष्मी आपल्या नातेवाईकांसोबत राहत होती. त्याचप्रकारे शेषनगर खरबी येथील ३० वर्षीय अतुल काटोले याने ७ डिसेंबर रोजी स्वत:ला जाळून घेतले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लग्नात सव्वा लाखाचे दागिने लंपास नागपूर : गांधीसागरस्थित रजवाडा पॅलेस येथे एका लग्नसमारंभात सव्वा लाखाचे दागिने चोरीला गेले. बजाजनगर येथील संजय भैसारे हे ७ डिसेंबर रोजी रजवाडा पॅलेस येथे आयोजित लग्नसमारंभात गेले होते. भैसारे यांची पत्नी सकाळी १०.१५ वाजता आपली बॅग खाली ठेवून लग्न लावत होती. दरम्यान अज्ञात आरोपीने त्यांची बॅग चोरून नेली. बॅगेत मोबाईलसह सव्वा लाखाचे दागिने ठेवले होते. दोन घरात चोरी नागपूर : चोरट्यांनी दोन घरातून सव्वा लाखाचा माल चोरून नेला. मिनीमातानगर कळमना येथील दिलीपसिंह हे २४ नोव्हेंबर रोजी कुटुंबासह बाहेर गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घरून ६० हजार रुपयासह एक लाखाचे दागिने चोरून नेले. त्याचप्रकारे गव्हर्नमेंट प्रेस कॉलनी दाभा येथील मार्तंड गोतमारे ८ डिसेंबर रोजी लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घरून रोख रकमेसह सव्वा लाखाचे दागिने असे एकूण पावणेदोन लाखाचे दागिने चोरीला गेले.