अल्पवयीन मुलीची आत्महत्या : मामा-मामीविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST
करमाळा : अल्पवयीन मुलीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी तिच्या मामा-मामी यांच्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े याबाबत मयत मुलीचे आजोबा बबन शिवदास काळे (रा.रावगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आह़े कैलास बबन काळे व ममता कैलास काळे यांच्याकडे आपली नात नम्रता निवृत्ती राऊत (16 ) ही राहावयास होती़ या दोघांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून तिने 8 मार्च रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल़े त्यात ती गंभीर जखमी झाली़ उपचारादरम्यान तिचे निधन झाल्याने तिच्या मृत्यूस ते दोघे कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आह़े या प्रकरणी काळे पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपनिरीक्षक बोधनापोड करीत आहेत़(वार्ताहर)