शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या करणारा शेतकरी भित्राच - हरियाणाच्या कृषीमंत्र्यांची मुक्ताफळे

By admin | Updated: April 29, 2015 11:31 IST

देशभरात शेतक-यांच्या आत्महत्येचे सत्र सुरु असतानाच हरियाणाच्या कृषीमंत्र्यांनी शेतक-यांनाच भित्रा ठरवत त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग केले आहेत.

ऑनलाइन लोकमत

चंदिगड, दि. २९ -  अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने हताश झालेल्या शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु असतानाच हरियाणातील भाजपा सरकारमधील कृषी मंत्र्यांनी शेतक-यांना भित्रा ठरवत शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे उद्योग केले आहे. आत्महत्या करणारे शेतकरी भित्रे असून सरकार अशा शेतक-यांसोबत नाही असे संतापजनक विधान कृषीमंत्री ओमप्रकाश धनकड यांनी केले आहे. 

शेतक-यांच्या आत्महत्येच्या घटनेने देशभरातून चिंता व्यक्त होत असतानाच या गंभीर विषयावर हरियाणाचे कृषीमंत्री ओमप्रकाश धनकड यांनी ज्ञान पाजळले. धनकड म्हणाले, आत्महत्या करणे हा कायद्यानुसार गुन्हा असून असा गुन्हा करणा-या शेतक-यांना सरकार पाठिंबा देणार नाही. कोणत्याही परिस्थीतीत आत्महत्येला प्रोत्साहन द्यायला नको असेही त्यांनी स्पष्ट केले. धनकड यांच्या विधानावर आता सर्वच स्तरातून तिखट प्रतिक्रिया येत आहे. शेतकरी पिकाचे नुकसान व कर्जाचा डोंगर यामुळे त्रस्त झाला आहे व धनकड त्यांना भित्रा ठरवत आहेत हा प्रकार निंदनीय आहे असे काँग्रेसचे स्थानिक नेते अशोक तंवर यांनी सांगितले. तर धनकड यांनी शेतक-यांचा अपमान केला असे अजय माकन यांनी म्हटले आहे.