शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांना पुन्हा बिनव्याजी कर्ज

By admin | Updated: June 23, 2014 23:57 IST

आर्थिक संकटात सापडलेल्या साखर कारखान्यांना आणखी 4,4क्क् कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला.

नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या साखर कारखान्यांना आणखी 4,4क्क् कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला. 
साखर कारखान्यांना मदत व्हावी यासाठी साखरेवरील आयात कर 15 टक्क्यांवरून 4क् टक्के करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. निर्यातीसाठी दिल्या जाणा:या सबसिडीची मुदत सप्टेंबर्पयत वाढविण्यात येणार आहे. 
साखर कारखान्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वरील निर्णय घेण्यात आले आहेत. साखर कारखान्यांकडे शेतक:यांचे 11 हजार कोटी रुपये थकले आहेत. यातील बहुतांश थकबाकी उत्तर प्रदेशातील आहे. साखर कारखान्यांचा तोटा भरून काढण्यासाठी पेट्रोलमध्ये 5 टक्के इथेनॉल मिसळणो बंधनकारक करण्यात येणार आहे. पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण हळूहळू 1क् टक्के करण्यात येणार आहे. 
केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या प्रश्नांकडे लक्ष देण्याच्या सूचना अन्न मंत्रलयाला केल्या होत्या. त्यानुसार पासवान यांनी बैठक घेतली. बैठकीत झालेल्या निर्णयांचे साखर उद्योगाची संघटना इस्माने स्वागत केले आहे. या निर्णयांमुळे साखर कारखान्यांकडे रोख रकमेचा ओघ वाढेल. शेतक:यांची थकबाकी देणो कारखान्यांना त्यामुळे सोपे होईल.
अन्नमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीला परिवहनमंत्री नितीन गडकरी, ‘एमएसएमई’ मंत्री कलराज मिश्र, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारमन, महिला व बाल विकासमंत्री मनेका गांधी, पेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान, पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र, मंत्रिमंडळ सचिव अजित सेठ यांची उपस्थिती होती.
नंतर पासवान यांनी पत्रकारांना सांगितले की, आम्ही प्रमुख 4 निर्णय या बैठकीत घेतले. साखर कारखान्यांनी अदा केलेल्या अबकारी कराच्या तुलनेत कारखान्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय यात प्रमुख आहे. या आधी 3 वर्षाच्या अबकारी कराच्या तुलनेत अर्थसाह्य दिले जात होते. ते आता 5 वर्षाच्या कराच्या तुलनेत दिले जाईल. त्यामुळे कारखान्यांना अधिक मदत मिळू शकेल. या निर्णयाचा थेट परिणाम म्हणून साखर कारखान्यांना बँकांकडून आणखी 4,4क्क् कोटींचे बिनव्याजी कर्ज मिळेल. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत होईल.
कारखान्यांना अबकारी कराच्या तुलनेत मिळणा:या बिनव्याजी कर्जाचा नेमका आकडा मात्र आपल्या मंत्रलयाने अद्याप काढलेला नाही, असे पासवान यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने साखर कारखान्यांना 6,6क्क् कोटींचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले होते. कारखान्यांना शेतक:यांची बिले अदा करता यावीत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. हे कर्ज बँकांमार्फत दिले जाणार होते. 
 
4कारखान्यांनी 3 वर्षे भरलेल्या अबकारी कराएवढे कर्ज त्यांना मिळणार होते. पासवान म्हणाले की, शेतक:यांची 11 हजार कोटी रुपयांची थकबाकी देण्याच्या हमीवर कारखान्यांना बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे.