आदर्श माहेश्वरी महिला मंडळ अध्यक्षपदी सुधा मंडोरा
By admin | Updated: January 26, 2017 02:07 IST
जळगाव : शहरातील आदर्श माहेश्वरी महिला मंडळाचा मायादेवीनगरातील रोटरी हॉल येथे मंगळवारी पदग्रहण सोहळा उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला़ यात नुतन अध्यक्षपदी सुधा मंडोरा यांची तर सचिवपदी गीता जाखेटे यांची निवड करण्यात झाली़ कार्यक्रमात घरकामगार सात महिलांचा सत्कार करण्यात आला़
आदर्श माहेश्वरी महिला मंडळ अध्यक्षपदी सुधा मंडोरा
जळगाव : शहरातील आदर्श माहेश्वरी महिला मंडळाचा मायादेवीनगरातील रोटरी हॉल येथे मंगळवारी पदग्रहण सोहळा उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला़ यात नुतन अध्यक्षपदी सुधा मंडोरा यांची तर सचिवपदी गीता जाखेटे यांची निवड करण्यात झाली़ कार्यक्रमात घरकामगार सात महिलांचा सत्कार करण्यात आला़मावळत्या अध्यक्षा राजश्री कोगटा यांच्याकडून नुतन अध्यक्षा सुधा मंडोरा यांनी पदभार घेतला़ यावेळी मासिक सभा तसेच हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते़ घरकाम करून आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देवून सक्षम नागरिक बनविणार्या सात घरकाम महिलांचा कार्यक्रमात नुतन तसेच मावळत्या अध्यक्षा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ या सत्काराने घरकाम कामगार महिला भारावल्या होत्या़ सत्काराला उत्तर देताना त्यांनी अनुभव कथन केले व सत्काराबद्दल आदर्श माहेश्वरी महिला मंडळाचे आभार मानले़ ज्योती ला व मंगला बियाणी यांनी सूत्रसंचालन केले़सदस्यांनी केले नृत्यराज दरबारात राणीचे पदग्रहण सोहळा या गीतावर सदस्यांनी नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले़ नृत्यात संगीता दहाड, संध्या मुंदडा, राधा काबरा, पुष्पा दहाड, ज्योती मंडोरा यांनी सहभाग घेतला़ यशस्वितेसाठी सुरेखा बियाणी, प्रणाली देपुरा, निलीमा धुप्पड, सीमा राठी, रेखा लाहोटी,शितल काबरा, अमिता सोमाणी, स्वाती लाठी, शुभांगी काबरा, ज्योती मंडोरा यांनी परिश्रम घेतले़