अचानक प्रकृती बिघडल्याने दोघांचा मृत्यू
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
अचानक प्रकृती बिघडल्याने दोघांचा मृत्यू
अचानक प्रकृती बिघडल्याने दोघांचा मृत्यू
अचानक प्रकृती बिघडल्याने दोघांचा मृत्यूनागपूर : अचानक प्रकृती बिघडल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शनिवारी दुपारी ३.२० वाजता आहुजानगर येथील रहिवासी मुकेश मदनलाल बजाज (२८) यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी जनता हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले़ दुसऱ्या घटनेत शनिवारी सकाळी ८ वाजता जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बँक कॉलनीतील रहिवासी सुरेश नायडू (रेड्डी) )५२) यांची अचानक प्रकृती खराब झाली. त्यांना उपचाराकरिता अर्नेजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले़